लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत महिनाभरापासून शहरात अनियमित पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तसेच शहरातील रस्त्यांचे सिमेंटीकरण होत असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यासाठी नगरपरिषदेने कोणतेही पाऊल उचलले नाही. नगरपरिषदेच्या विरोधात काँग्रेसने शुक्रवारी आक्रोश व्यक्त करीत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. वेळीच हा प्रकार थांबला नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.तुमसर शहराला कोष्टी घाटावरून पाणीपुरवठा केला जातो. परंतु नियोजन शुन्यतेमुळे भर पावसाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महिनाभरापासून महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासोबत शहरातील दुर्गामाता मंदिर ते गभने सभागृहापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. एकेरी मार्गानेच वाहतूक होत आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठाले खड्डे पडले असून रस्ता पुर्णत: नादुरूस्त झाले आहेत. खड्ड्यात टाकलेल्या मुरूमामुळे जड वाहन जातात धुळीचे साम्राज्य निर्माण होते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून आजारात वाढ झाली आहे. याबाबत अनेकदा नगरपरिषदेला सूचना देण्यात आली. परंतु नगरपरिषदेने झोपेचे सोंग घेतल्याचे दिसत आहे. धुळीचा प्रश्न निकाली काढून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना प्रदेश काँगे्रसचे सचिव प्रमोद तितीरमारे, महिला काँगे्रसच्या अध्यक्षा सीमा भुरे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमरनाथ रगडे, नैयनश्री येळणे, रमेश पारधी, स्मिता बोरकर, शुभम गभने, पंकज कारेमोरे, हसन मंसुरी, सुरेश मेश्राम, अमित लांजेवार, निलेश वासनिक, आलोक बन्सोड, भाऊदास गजभिये, शिव बोरकर, समीर कुरैशी, सुलभा हटवार, योगिता बावनकर, निशा गणवीर, प्रतिभा गजभिये, सरीता देशमुख, लिना समरीते, योगेश हिंगने, गजानन लांजेवार, येळणे आदी उपस्थित होते.
धुळीच्या विरोधात व पाण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 21:59 IST
गत महिनाभरापासून शहरात अनियमित पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तसेच शहरातील रस्त्यांचे सिमेंटीकरण होत असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यासाठी नगरपरिषदेने कोणतेही पाऊल उचलले नाही. नगरपरिषदेच्या विरोधात काँग्रेसने शुक्रवारी आक्रोश व्यक्त करीत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. वेळीच हा प्रकार थांबला नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
धुळीच्या विरोधात व पाण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा आक्रोश
ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांना निवेदन : तुमसर शहरातील नागरिक त्रस्त