शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

स्वतंत्र विदर्भ व शेतकरी हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

By admin | Updated: August 10, 2016 00:16 IST

जनतेला अच्छे दिन येणार अशी खोटी स्वप्ने दाखवून भाजपाने सत्ता हस्तगत केली.

भाजप शेतकरी विरोधी : नितीन राऊत यांची पत्रपरिषदेत माहितीसाकोली : जनतेला अच्छे दिन येणार अशी खोटी स्वप्ने दाखवून भाजपाने सत्ता हस्तगत केली. सत्तेत आल्यानंतर भाजपला जनतेचा विसर पडला आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ व शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस आता रस्त्यावर उतरणार असल्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.यावेळी राऊत म्हणाले, ऐन पावसाळ्यात कृषीपंपाचे १६ तासाचे भारनियमन सुरु आहे. त्यामुळे रोवणी खोळंबली असून शेतकऱ्यांना हमी भावही मिळाला नाही. काँग्रेस सरकारच्या काळात अशी वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. मोदी सरकारने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली असून उद्योगपतींना मदत करीत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याऐवजी उद्योगपतींचे बुडालेले कर्ज शासकीय तिजोरीतून देत आहेत. ज्या जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता काबीज केली तीच जनता आता पश्चाताप करीत आहे.भाजपने २०१४ ची निवडणूक स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर लढली. आता केंद्रात व राज्यात त्यांचीच सत्ता आहे. वेगळा विदर्भ का करीत नाही, असा प्रश्न करून ते म्हणाले, एकीकडे भाजपाचे आमदार व खासदार विदर्भाचा प्रस्ताव आणतात तर दुसरीकडे त्यांचेच मुख्यमंत्री मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे असे सांगून दिशाभूल करतात. विदर्भ वेगळा व्हावा ही काँग्रेसची इच्छा असून आता वेगळा विदर्भ व्हावा यासाठी विदर्भातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. यातून सर्वानुमताचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून वेगळ्या विदर्भासाठी जनआंदोलन करण्यात येणार आहे.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा सचिव डॉ.ब्रम्हाननद करंजेकर, तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत, डॉ.अजय तुमसरे, शहर अध्यक्ष अश्विन नशिने, जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते, अशोक कापगते, मंदा गणवीर, पंचायत समिती सदस्य छाया पटले, माजी सरपंच हेमलता परसगडे, माजी सभापती क्रिष्णा मेश्राम, माजी सभापती ताराबाई तरजुले, माजी उपसभापती नरेश नगरीकर, माजी सभापती केवळराम लांजेवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)आधी आठ जिल्हे वेगळे कराविदर्भाची मागणी आमची आहे. तत्पूर्वी विदर्भातील आठ नव्या जिल्ह्याची घोषणा करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना आम्ही केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी नवीन जिल्ह्याच्या प्रस्तावालाही केराची टोपली दाखविली. या आठ जिल्ह्यात साकोली जिल्ह्याचाही समावेश आहे.कामाला लागामाजी मंत्री नितीन राऊत यांनी जाताजाता जिल्हा सचिव डॉ. ब्रम्हानंद करंजेकर यांना आता कामाला लागा, असे सर्वासमोर सांगितले. आगामी पालिका निवडणुकीसाठी की विधानसभा निवडणुकीसाठी हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र त्यांनी दिलेला इशारा इतरांना पेचात पाडणारा होता.नगरपरिषद निवडणुका वेळेवर पाहूआगामी नगरपरिषदांच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी या आघाडीसंदर्भात विचारले असता तो निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.