शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राकाँचा सामाजिक समीकरणावर भर

By admin | Updated: October 8, 2015 00:30 IST

भारतीय जनता पार्टीच्या सत्ता केंद्राला हादरा देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळे लढत ...

सर्व ताकदीनिशी सर्व पक्ष मैदानात : मोहाडी नगरपंचायत सत्ता स्थापनेसाठी चढाओढराजू बांते मोहाडीभारतीय जनता पार्टीच्या सत्ता केंद्राला हादरा देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळे लढत असले तरी त्यांचे मोहाडी नगर पंचायतीत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी सामाजिक समीकरणात गुंतली आहे.आजपर्यंत मोहाडी ग्रामपंचायतवर काँग्रेसचे राज्य होते. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या गडाला भारतीय जनता पक्षाने खिंडार पाडले. भाजपाचा सरपंच बनला. त्यावेळी भाजपाला राष्ट्रवादीची साथ मिळाली होती. मोहाडीवर भाजपाचा झेंडा फडकला. महिला सरपंच बनल्या. त्यांनी अडचणीवर मात करून मोहाडीचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळले होते. परंतु काही सदस्यांच्या बाबतीत नाराजी दिसत होती. आता नगर पंचायतची निर्मिती होवून ग्रामपंचायत विसर्जित झाली. पुढव्या काही दिवसात नगर पंचायतच्या निवडणुका होणार हे लक्षात ठेवून भाजपासह काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष दमाने कामाला लागला आहे. मोहाडी येथे काँग्रेसची फळी मजबुत आहे. याच हिमतीवर काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर येण्याचा निर्धार केला आहे. आज मोहाडी काँग्रेस पक्षासाठी अनुकूल असले तरी भाजपाचे तगडे आवाहन आव्हान काँग्रेसला पेलावे लागणार आहे. कारण, केंद्र, राज्य तसेच मोहाडी पंचायत समितीवर भाजप आहे. याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपाला होवू शकतो. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे हे भाजपाचे असल्यामुळे मोहाडी नगर पंचायत निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची राहणार आहे. काँग्रेसमध्ये दोन समाजाचे स्थानिक नेते आहेत. त्यांच्याच नेतृत्वात नगर पंचयतची निवडणूक लढविली जाणार आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचेही अस्तित्व आहे. या निवडणुकीत समर्थपणे लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष तयार झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, आमदार राजेंद्र जैन व राष्ट्रवादीची जिल्ह्यातील मंडळी मोहाडी नगर पंचायतच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. मोहाडी नगर पंचायत निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष उत्स्तुक आहे. भाजपाचा मित्र पक्ष शिवसेना मोहाडीत पहिल्यांदाच लढत आहे. शिवसेना या निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. पण, मोहाडीत शिवसेनेची बांधणी मजबूत नाही. त्यामुळे शिवसेना प्रत्यक्षपणे भाजपाला ऐनवेळी मदत करते की विरोधात भक्कपणे उभी राहील याचा अंदाज आताच लावता येत नाही. पण, सत्ता जोड-तोडसाठी शिवसेनेचे मते निर्णायक राहणार असल्याचे दिसून येते. तथापि, मोहाडी येथे होणारी नगर पंचायत निवडणूक काँग्रेस व भाजपात सरळ लढत होण्याची अधिक शक्यता आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस गुरूवार आहे. यादिवशी उमेदवारी अर्ज सगळेच पक्षाचे उमेदवार करणार आहेत. उमेदवार शोधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची दमछाक होत आहे. भाजपा व काँग्रेस आपले १७ ही उमेदवार उभे करतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेनेला पूर्ण उमेदवार उभे करण्यासाठी उमेदवारांचा अजूनही शोध घ्यावा लागत आहे. उमेदवारीसाठी भाजपामध्ये काही प्रमाणात संघर्ष सुरू आहे. या संघर्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. काँगे्रसने सामोपचाराने उमदेवार ठरवित आहे. मोहाडीत सर्व पक्षासमोर एकच प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे प्रभाग ९ व प्रभाग १२ मध्ये उमेदवार कोण द्यावा. प्रभाग ९ अनुसूचित जमाती खुला, प्रभाग १२ अनुसूचित जमाती स्त्री राखीव यांच्यासाठी आहे. मोहाडीत एस.टी. समाज कमी आहे. एस.टी.मध्ये गोंड जातीचा समावेश होतो. आता हलबा समाजाला एस.टी. प्रवर्गाची जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे ही अडचण सर्वच पक्षांसमोर उभी आहे.