शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपद काँग्रेसला ! प्रथमच आदिवासी महिलेला अध्यक्षपदाचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:00 IST

Bhandara : कविता उईकेंच्या रूपाने भंडाऱ्यात प्रथमच आदिवासी महिला जि.प. अध्यक्षपदी

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने येथील जिल्हा परिषदेतील अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पदरात अध्यक्षपद पडले तर उपाध्यक्षपद महायुतीकडून राष्ट्रवादीने मिळविले. भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच आदिवासी महिलेला कविता उईके यांच्या रूपाने अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला. तर उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत एकनाथ फेंडर अविरोध निवडून आले.

जिल्हा परिषद सभागृहात दुपारी २:३० वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभझाला. ५२ सदस्य संख्या असलेल्या सभागृहात यावेळी अध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिलेला आरक्षित होते. भाजपकडून महेश्वरी नेवारे यांचे नाव ठरले असतानाच ऐनवेळी जात वैधता प्रमाणपत्रावरून त्यांचे सदस्यत्व रद्द झाले. महायुतीकडे अध्यक्षपदासाठी उमेदवारच नव्हता. त्यामुळे काँग्रेसच्या कविता उईके अविरोध निवडून आल्या.

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत संख्याबळ कमी असल्याचे लक्षात आल्याने काँग्रेसने आपल्या उमेदवाराचे नामांकनच भरले नाही. महायुतीकडून एकनाथ फेंडर यांचे एकमेव नामांकन आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. 

काँग्रेसलाही धक्का सभागृहात सर्वाधिक म्हणजे २१ सदस्य असतानाही उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला. काठावर असलेल्या सदस्यांना खेचण्यात काँग्रेसला अपयश आले. यात महायुतीमधील विशेषतः राष्ट्रवादीने चतुराईने राजकीय खेळी करून एकनाथ फेंडर यांना ओढले. परिणामतः संख्याबळात कमी पडत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने काँग्रेसने उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाची नामुष्की टाळली.

उईके यांना भाजपकडे खेचण्याचा प्रयत्न नेवारे यांचे सदस्यपद रद्द होत असल्याचे संकेत मिळताच भाजपकडून कविता उईके यांना खेचण्याचा प्रयत्न झाला. मात्र, महायुतीमधीलच काही मंडळींकडून यासाठी विरोध झाल्याची माहिती आहे. परिणामतः भाजपचे स्वप्न भंग पावले.

"गरीब, आदिवासी कुटुंबातील एका महिलेला अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली, हा आपल्या समाजाला मिळालेला सन्मानच आहे. सर्वांना सोबत घेऊन विकासाचा समतोल साधण्यावर आपला भर राहील." - कविता उईके, अध्यक्ष

"महायुतीमधील सर्व नेतेमंडळी आणि सदस्यांच्या सहयोगातून उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. ही जबाबदारी आपल्यासाठी महत्वाची आहे. त्या सर्वांना सोबत घेऊन काम करू." - एकनाथ फेंडर, उपाध्यक्ष

टॅग्स :bhandara-acभंडाराZP Electionजिल्हा परिषद