शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी वीज कार्यालयावर धडकले काँग्रेस पदाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:53 IST

मोहाडी तालुक्यातील प्रलंबित कृषी वीज पंपाची जोडणी करणे तसेच थकीत कृषी, घरगुती व गृह उद्योग व्यावसायिक वीज ग्राहकांचा विद्युत ...

मोहाडी तालुक्यातील प्रलंबित कृषी वीज पंपाची जोडणी करणे तसेच थकीत कृषी, घरगुती व गृह उद्योग व्यावसायिक वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये, कृषीपंप वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्यात यावी, लाईनमेन कर्मचार्‍यांनी विद्युत जोडणीचे काम स्वत: करावे, अनधिकृत खासगी व्यक्तीकडून विद्युत जोडणीचे काम करू नये, विद्युत विभागाच्या संहितेतील अटी, शर्ती व अधिनियमाच्या अधीन राहून कामकाज करण्यात यावे, वीज ग्राहकांशी अपमानजनक वागणूक करणार्‍या कर्मचार्‍यांवर रीतसर कारवाई करण्यात यावी, भारनियमन बंद करण्यात यावे यासारख्या इतर समस्यांबाबत मोहाडी येथील विद्युत विभागाच्या उपविभागीय अधिकार्‍यांशी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी चर्चा केली असता उपविभागीय अधिकार्‍यांनी समस्या विहीत कालावधीत निकाली काढण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले.

शिष्टमंडळात मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष राजेश हटवार, राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र इलमे, तुमसर मोहाडी विधानसभा बूथ प्रमुख गजानन झंझाड, जेष्ठ नेते आशिष पात्रे, न. प. उपाध्यक्ष सुनील गिरीपुंजे, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष हरिराम निमकर, डॉ. विनोद मते, प्रदीप डेकाटे, धनराज गायधने, श्रीधर गिरेपुंजे, काशिनाथ गिरेपुंजे, अयुब शेख, गजानन बशीने, योगीराज दमाहे, अमित खोब्रागडे, राधेश्याम खोब्रागडे, शंकर मोहरे, देवीलाल लिल्हारे, शिवलाल लिल्हारे, कुकडे तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.