शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

सभापती निवडणुकीत काॅंग्रेसचा कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

भंडारा जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामाेडी घडत १० मे राेजी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड पार पडली. काँग्रेसने भाजपचा एक गट फाेडून अध्यक्षपद मिळविले. तर त्या बंडखाेर गटाला उपाध्यक्ष पद दिले. आता गुरुवार १९ मे राेजी सभापती पदाची निवडणूक हाेत आहे. माजकल्याण, महिला व बालकल्याण आणि उर्वरित दाेन विषय समितीच्या सभापती पदाची निवड हाेणार आहे. यासाठी आता काँग्रेस पक्षांतर्गत माेठी माेर्चेबांधणी सुरू झाली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजप बंडखाेरांना साेबत घेऊन काॅंग्रेसने जिल्हा परिषदेचा गड सर केला. मात्र आता सभापती निवडणुकीत काँग्रेसचा चांगलाच कस लागत आहे. पक्षांतर्गत नाराज सदस्य, जातीय समीकरण आणि बंडखाेरांना सामावून घेण्याची माेठी कसरत काँग्रेसच्या नेत्यांना करावी लागणार आहे. येत्या १९ मे राेजी सभापतीची निवडणूक हाेत असल्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.भंडारा जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामाेडी घडत १० मे राेजी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड पार पडली. काँग्रेसने भाजपचा एक गट फाेडून अध्यक्षपद मिळविले. तर त्या बंडखाेर गटाला उपाध्यक्ष पद दिले. आता गुरुवार १९ मे राेजी सभापती पदाची निवडणूक हाेत आहे. समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि उर्वरित दाेन विषय समितीच्या सभापती पदाची निवड हाेणार आहे. यासाठी आता काँग्रेस पक्षांतर्गत माेठी माेर्चेबांधणी सुरू झाली आहे. आपल्याला सभापती पद मिळावे यासाठी नेत्यांची मनधरणी केली जात आहे. दुसरीकडे काँग्रेस नेत्यापुढे संतुलन राखत सभापती पद देण्याचे माेठे दिव्य आहे. काँग्रेसचे २१ सदस्य असून एकाला अध्यक्षपद मिळाल्याने आता २० सदस्यातून सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाेबतच भाजपमधून बंडखाेरी करून आलेले पाच आणि एक अपक्ष सदस्य यांनाही सामावून घ्यायचे आहे. तब्बल २५ जणांमधून चार जणांची निवड करण्याचे माेठे काम काँग्रेस पक्षासमाेर आहे.सभापती निवडताना काँग्रेसमधील नाराज झालेल्या सदस्यांनाही खूश करण्याचा प्रयत्न हाेण्याची शक्यता आहे. यासाेबतच जातीय समीकरणाचे संतुलन राखण्याचे काँग्रेसपुढे माेठे आव्हान आहे. बंडखाेर भाजप गटाला जिल्हा परिषदेतील मलाईदार पद हवे आहे. त्यांचा डाेळा बांधकाम सभापती पदावर आहे. आता काँग्रेस बांधकाम सभापती पद आपल्याकडे ठेवणार की बंडखाेर गटाला देणार हेही पाहणे तेवढेच महत्त्वाचे राहणार आहे.सभापती पदासाठी अनेक जण इच्छुक असले तरी काँग्रेसकडून तुमसर तालुक्याच्या बपेरा गटाचे रमेश पारधी, लाखनी तालुक्याच्या केसलवाडा गटाच्या स्वाती वाघाये आणि साकाेली तालुक्यातील वडद गटाचे मदन रामटेके यांच्या नावाची काॅंग्रेसकडून चर्चा आहे. तर बंडखाेर भाजपकडून तुमसर तालुक्यातील देव्हाडी गटाचे राजेश सेलाेकर यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र विकास फाऊंडेशनचे सर्वेसर्वा चरण वाघमारे कुणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ घालतात, हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

विराेधकांच्या खेळीकडे लागल्या नजरा- सभापती निवडणुकीत ऐन वेळी राष्ट्रवादी आणि भाजपचा गट काेणती खेळी खेळणार याकडे लक्ष लागले आहे. २७ सदस्य जुळवून काॅंग्रेसने अध्यक्षपद मिळविले. मात्र त्याचवेळी २५ सदस्य विराेधात आहेत. सभापती पदासाठी २७ सदस्यांचे बहुमत असून, दाेन सदस्य फाेडण्यासाठी विराेधी गटांनी कंबर कसली आहे.- काॅंग्रेसमध्ये अनेकजण सत्ता स्थापनेवरून नाराज आहेत. सभापतिपदाच्या निवडणुकीत ते काही गडबड करतात का याची चाचपणी विराेधी गटाकडून केली जात आहे. तर सत्ताधारी गट त्यांची मनधरणी करण्यात व्यस्त आहे. अशा स्थितीत काही सदस्य पुन्हा सहलीसाठी जाण्याच्या तयारीत आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद