आसावरी देवतळे : तुमसरात काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावातुमसर : भाजपने चांगले दिवस येणार असल्याचा गाजावाजा करत केंद्रात व राज्यात सत्ता हस्तगत केली. मात्र प्रत्यक्षात लोकांना वाईट दिवसाचाच अनुभव झाला. महगाई कमी करणे तर दूर महगाई झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भाजपचे पितळे उघडे पडले व काँग्रेसने लोकांचा विश्वास संपादन करणे सुरू केले असून आता काँग्रेसचे अच्छे दिन येऊ लागले आहे. त्यामुळे तुमसर नगर पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकावा, असे आवाहन प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सचिव आसावरी देवतळे यांनी केले.स्थानिक अग्रेसन भवनात काँग्रेसचा नगर पालिका निवडणूक मोर्चेबांधणी आणि तुमसर व मोहाडी तालुका कार्यकर्ता मेळाव्या त्या बोलत होत्या. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर सिंगणजुडे, माजी आमदार अॅड.आनंदराव वंजारी, विधानसभा निरीक्षक मुजीब पठाण, पालिकेचे गटनेते प्रमोद तितिरमारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सिमा भुरे, मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष अजय गडकरी उपस्थित होते. यावेळी आसावरी देवतळे म्हणाल्या, भंडारा व तुमसर नगर पालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही शहराचा विकास झाला नाही. तुमसर शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना दूषित पाणी मिळत आहे. परिणामी ते पाणी त्यांना प्यावे लागत आहे.भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेत असताना कार्यकर्ते रास्ता रोको करून नागरिकांची दिशाभूल करू पाहत आहेत. सत्य लोकापुढे आणून त्यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, निरीक्षक मुजीब पठाण यांची समायोजित भाषणे झाली. प्रास्ताविक शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमर रगडे यांनी तर संचालन राजेश ठाकूर व लक्ष्मी ढबाले यांनी केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पदाधिकारी नारायण तितिरमारे, डॉ.मधुकर लंजे, आशिष पात्रे, शंकर राऊत, स्वाती निमजे, सुनिल गिरीपुंजे, नलिनी डिंकवार, लक्ष्मी कहालकर, सविता ठाकूर, के.के. पंचबुद्धे, अशोक बन्सोड, लक्ष्मी बिसने, कुसुम कांबळे, दिलीप चोपकर, अरविंद जोशी, विजय गिरीपुंजे, खुशाल गायधने, प्रफुल बिसने, निरज गौर, शैलेश पडोळे, चैनलाल मसरके, राकेश कारेमोरे, योगिता बावनकर, राजेश हटवार, कान्हा बावनकर, मनोहर बिसने, मिलिंद गजभिये यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
काँग्रेसचा झेंडा फडकावा
By admin | Updated: August 6, 2016 00:26 IST