शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

एमपीएससी व रेल्वे परीक्षा एकाच दिवशी आल्याने संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 05:00 IST

केंद्रीय स्तरावर होणाऱ्या रेल्वे परीक्षेची तारीख आधीच जाहीर झाली होती. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा (एमपीएससी) कोरोना पार्श्वभूमीवर अनेकदा तारीख बदलल्याने परीक्षार्थींमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तरीही विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला होता. १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताच संपूर्ण राज्यभरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा निषेध नोंदवला होता.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २१०० विद्यार्थी देणार एमपीएससी परीक्षा

संतोष जाधवरलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा रद्द करून आता नव्याने  ही परीक्षा २१  मार्च रोजी होणार आहे. या परीक्षेची भंडारा जिल्ह्यात सहा केंद्र असून, जिल्ह्यातील २१०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. मात्र, याच दिवशी रेल्वेचीही परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी एकच परीक्षा देता येणार आहे. केंद्रीय स्तरावर होणाऱ्या रेल्वे परीक्षेची तारीख आधीच जाहीर झाली होती. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा (एमपीएससी) कोरोना पार्श्वभूमीवर अनेकदा तारीख बदलल्याने परीक्षार्थींमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तरीही विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला होता. १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताच संपूर्ण राज्यभरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा निषेध नोंदवला होता. काही ठिकाणी परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने विद्यार्थ्यांनी आपला राग व्यक्त केला होता. त्यामुळे याची दखल घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कालावधीतच एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख २१ मार्च रोजी जाहीर केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, यापुढे एमपीएससीने ठरलेल्या नियोजनानुसारच परीक्षा घ्याव्यात, अशी मागणीही विद्यार्थ्यांमधून होत आहे. यासोबतच रेल्वेची परीक्षा देता येत नसल्यानेही काही विद्यार्थ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.  २१ मार्च रविवार रोजी होत असलेल्या जिल्ह्यात सहा परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांचे थर्मल स्कॅनिंग होणार आहे. त्यामुळे शरीराचे तापमान समजले जाणार आहे. थर्मल स्कॅनिंग दरम्यान एखाद्या विद्यार्थ्याचे तापमान जास्त आढळून आल्यास त्याला स्वतंत्र बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र रेल्वे आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी आल्याने गाेंधळ उडत आहे.

नियुक्त कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी 

लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे तपासणी अहवाल पाहूनच त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर व सुरक्षेची अन्य साधने पुरविली जाणार आहेत. 

एमपीएससी परीक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या स्टाफची आरटीपीसीआर टेस्ट केली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्र सॅनिटायझर करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी प्रवेश देताना प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग, टेम्परेचर मोजूनच प्रवेश दिला जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याचे तापमान जास्त  असल्यास त्याच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाईल. - शिवराज पडोळे,निवासी उपजिल्हाधिकारी, भंडारा.

नोकरी करीत असल्याने मिळेल त्या वेळेत अभ्यास केला. कोरोना पार्श्वभूमीवर मार्गदर्शनावर मर्यादा आली. मात्र, नोकरी सांभाळून स्पर्धा परीक्षेची  अनेक जण तयारी करतात. यामुळे चर्चेतून समस्या सोडवतो. - रेणुका दराडे,  परीक्षार्थी, भंडारा.

परीक्षेची तयारी घरी राहूनही करता येते. जिल्हास्तरावरच परीक्षा केंद्र असल्याने परीक्षार्थींसाठी फायदेशीर आहे. माझी तयारी सुरु असून, आत्मविश्वासपूर्वक २१ मार्च रोजी परीक्षा देणार आहे.- दीपक आहेर, परीक्षार्थी तथा मंडल कृषी अधिकारी, भंडारा

एमपीएससी व रेल्वे भरतीची परीक्षा एकाच दिवशी होत आहेत. त्यामुळे कोणती परीक्षा द्यायची यावरून काही दिवस घालमेल होत हाेती. मी एमपीएससीचीच परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.- निरोप धारगावे,परीक्षार्थी. 

 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाrailway recruitmentरेल्वेभरती