शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

ग्रामसभेत गोंधळ

By admin | Updated: May 11, 2015 00:21 IST

शासन तथा राजकीय इच्छाशक्तीअभावी सिंदपुरी गावात समस्यांचा डोंगर उभा असतांना गावकरी संकटात आहेत.

अनेक ठराव पारित : प्रश्नांचा भडीमार, सिंदपुरीतील प्रकारभंडारा : शासन तथा राजकीय इच्छाशक्तीअभावी सिंदपुरी गावात समस्यांचा डोंगर उभा असतांना गावकरी संकटात आहेत. या असंतोषाचे खापर आयोजित ग्रामसभेत फोडण्यात आले. प्रश्नांना भडीमार व असंतुष्ट उत्तर यामुळे सभेत गोंधळ निर्माण झाला.महाराष्ट्र दिनी आयोजित असणाऱ्या ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आल्याने पुन्हा ग्रामसभा पुर्ण करण्याची प्रक्रिया सिहोरा परिसरात सुरु झाली आहे. सिंदपुरी गावात गेल्या वर्षीपासून समस्यांचा डोंगर उभा असतांना काल आयोजित ग्रामसभेत गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले.सभा मंडपात आयोजित सभेत गावकऱ्यांनी अनेक ज्वलंत प्रश्न मांडले. शासन आणि बडे लोक प्रतिनिधी यांच्या अधिकार क्षेत्रातील अनेक प्रश्न चर्चेत आहे. गेल्या वर्षात २३ जुलै २०१४ ला तलावाची पाळ फुटल्याने गावात पाणी शिरले. तर शेतकऱ्यांचे उभे धानाचे पीक वाहुन गेले. पंरतु शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. या पाण्याने २१० घरे बाधीत झाली असून ५२ कुटुंबीय टिनाच्या शेडमध्ये वास्तव्य करित असतांना पावसाळ्यापूर्वी या कुटुंबीयांचा घरकुलांचा प्रश्न निकाली काढण्यात आलेला नाही. वर्षातील टिनाचे शेड आता जणर््ीा झाली आहेत. यामुळे पुन्हा विस्तापित कुटूंब अडचणीत आली आहे. या शिवाय २ कोटी ४० लाख रुपये तलाव दुरुस्तीचा कृती आराखडा तयार असताना प्रत्यक्षात तलावाच्या कामांना सुरुवात झाली नसल्याने यंदा ३०० एकर आर भात पिकांची शेती बुडीत राहणार आहे. यात ६० ते ७० शेतकरी अडचणीत येणार असल्याचे ठराव घेण्याची ओरड गावकऱ्यांनी केली.आयोजित ग्रामसभेत पुन्हा मुख्यालयात वास्तव्याचा मुद्दा उपस्थित करुन घरभाडे भत्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तलाठी, शिक्षक आणि ग्रामसेवक मुख्यालयात वास्तव्य करित नाही. पंरतु घरभाडेची उचल करतात. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविण्याची भुमिका मांडली. वरिष्ठ अधिकारी पाठराखण करित असल्याने त्यांच्या विरोधात ठराव पारित करण्याचे ग्रामसभेचे ठरविले. उन्हाळी धान पिकाला पाण्याची गरज आहे. परंतु शेतकऱ्यांना थ्री फेज विज पुरवठा ८ तास करण्यात येत आहे. यामुळे उन्हाळी धानाचे पीक अडचणीत आल्याचा मुद्दा भाकिसचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर यांनी ग्रामसभेत मांडला. या विषयासंदर्भात ठराव घेण्यात आला आहे. गावात नवीन ग्राम पंचायत इमारत बांधकाम मंजूर झाल्याने जुनी इमारत भुईसपाट करण्यात आली आहे. या इमारतीचे दरवाजे, लोखंड आणि खिडक्या विक्री करण्यात आले आहे. असा प्रश्न तमुसचे अध्यक्ष बंडु वैद्य यांनी उपस्थित केले. ग्राम सेवक पि एस. नागदेवे यांना विचारणा केली असता, त्यांनी माहित नसल्याचे सांगितले. यामुळे या साहित्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून परस्पर विक्री करण्यात आल्याचे आरोप करताच ग्रामसभेत गोंधळ उडाला. या संदर्भात सरपंच योगिता पारधी यांना संपर्क साधले असताना त्यांचा भ्रमणध्वनी ‘आऊट आॅफ कव्हरेज’ होता. उपसरपंच देवानंद वासनिक यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. (वार्ताहर)