शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

बक्षीसपत्राच्या नोंदणीवरून संभ्रम

By admin | Updated: June 2, 2015 00:29 IST

बक्षिसपत्र करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गेलेल्या नागरिकांना तेथील अधिकारी दोन टक्के शुल्क भरण्यासाठी...

मोहाडीतील प्रकार : पदाधिकारी विरूद्ध अधिकारी मोहाडी : बक्षिसपत्र करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गेलेल्या नागरिकांना तेथील अधिकारी दोन टक्के शुल्क भरण्यासाठी सांगतात तर या तुमसर क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे नवीन अध्यादेशाप्रमाणे केवळ २०० रूपयात बक्षिसपत्र होते, असे सांगतात. यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, आ.चरण वाघमारे यांनी शासनाकडे नोंदणी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली असून आम्ही योग्य आकारणी करीत असल्याचे नोंदणी अधिकारी सांगत आहेत. २४ एप्रिल २०१५ च्या नवीन अध्यादेशात पृष्ठ १० मधील क्रमांक १८ मधील अनुच्छेद ३४ मधील तरतुदीत रक्त नाल्यातील व्यक्तींना केवळ २०० रूपयात निवासी अथवा कृषी मालमत्ता बक्षिसपत्र करता येईल, असा उल्लेख आहे. मात्र त्यात नोंदणी शुल्क व स्थानिक शुल्काचा उल्लेख नाही. यामुळे दुय्यम निबंधक हे बक्षिसपत्र करणाऱ्यांना एक टक्का नोंदणी शुल्क व एक टक्का स्थानिक शुल्क असे दोन टक्के मालमत्तेचा किमतीवर आकारणी करीत आहेत. मात्र यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. आ.वाघमारे यांनी ३० मे रोजी मोहाडी तहसिल कार्यालयातील दुय्यम निबंधकांना बोलावून बक्षिसपत्र, आपसी हिस्सेवाटणी २०० रूपयात करण्यासाठी सांगितले. मात्र निबंधक कार्यालयाच्या मते हा नवीन अध्यादेश मुद्रांक शुल्काबाबत आहे. मुद्रांक शुल्क कमी करून २०० करण्यात आला. विक्रीपत्र तसेच इतर बाबतीत ज्याप्रकारे स्थानिक कर व नोंदणी शुल्क घेण्यात येतो तसाच बक्षिसपत्राच्या बाबतीत आहे. याच अध्यादेशात क्रमांक १६ मध्ये विक्रीपत्रासाठी तीन टक्के शुल्क घेण्याचे निर्देश आहेत मात्र आम्ही एक टक्का स्थानिक कर व एक टक्का नोंदणी शुल्क असे पाच टक्के नोंदणी व मुद्रांक अधिनियमाप्रमाणे आकारणी करतो. त्यामुळे २०० रूपयात बक्षिसपत्र करता येणार नाही, मात्र हिस्से वाटणीपत्र २०० रूपयात करता येते, असे नोंदणी विभागाचे म्हणने आहे. (शहर प्रतिनिधी)जनतेच्या सुविधेसाठी राज्य शासनाने आपसी हिस्से वाटणी व बक्षिसपत्र केवळ २०० रूपयात नोंदणी करण्याची सोय करून दिली आहे. मात्र नोंदणी अधिकारी जनतेला त्रास देत असून या अधिकाऱ्यांची शासनाकडे तक्रार केली आहे. जनतेने २०० रूपयातच हिस्सेवाटणी व बक्षिसपत्र करून घ्यावे.- चरण वाघमारे, आमदार, तुमसर.मुद्रांक व नोंदणी अधिनियमानुसार एक टक्का स्थानिक कर व एक टक्का नोंदणी शुल्क घेतला जातो. नवीन अध्यादेशानुसार बक्षिसपत्र करताना मुद्रांक शुल्क २०० रूपये करण्यात आले आहे. स्थानिक कर व नोंदणी शुल्कात सुट देण्यात आलेली नाही. हिस्से वाटणी मात्र २०० रूपयातच करण्यात येत आहे.- राजेश देशकर, सहजिल्हानिबंधक, भंडारा.