शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीविषयी संभ्रमावस्था

By admin | Updated: December 18, 2015 01:02 IST

साकोली लाखांदूर वडसा राज्य महामार्ग क्रमांक २७२ चे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

सासरा : साकोली लाखांदूर वडसा राज्य महामार्ग क्रमांक २७२ चे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यासंबंधाने संबंधित यंत्रणेने या मार्गाचा सर्वे केला. रुंदीकरणाविषयक मोजमाप केली. या मार्गात अनेक लहान मोठी गावे आहेत. हा मार्ग काही गावांच्या आतून तर काही गावांच्या बाहेरून गेला आहे.या मार्गातील सानगडी हे गाव आकाराने मोठे असलेले गाव आहे. सदर राज्यमार्ग क्र. २७२ या गावाच्या माध्यमातून गेला आहे. हा गाव लांबीने अधिक असल्याने या ठिकाणी दोन बसस्टँड आहेत. या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यासंबंधी शासन प्रशासनाकडून घोषणा झाल्याची चर्चा आहे. सानगडी गावातून गेलेला हा मार्ग सध्या सर्वांच्या सोयीचा समजला जातो. हा येथील मुख्य मार्ग असल्याने येथील संपूर्ण मार्केटिंग या मार्गाच्या कडेला आहे.या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्यास हा मार्ग नेमका कोठून जाईल? आतून की बाहेरून? असे प्रश्न येथील नागरिकांसमोर उभे आहेत. हा मार्ग सानगडी गावाच्या आतून गेल्यास या मार्गाच्या कडेला असलेली अनेक घरे उध्वस्त होतील. बाहेरून गेल्यास या गावातील नागरिकांची बरीच मोठी शेती जाईल आणि सानगडी गाव बाजूला राहील. हा मार्ग नेमका कोठून जाईल याविषयी शासन प्रशासनाने भूमिका स्पष्ट न केल्याने तसेच हा मार्ग नेमका किती रुंद असेल याविषयी नागरिकांना जाहीर निवेदनातून न कळविल्या गेल्याने येथील नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.शासन प्रशासनाने या मार्गाविषयी इत्यंभूत माहिती जाहीर निवेदनातून प्रसिद्ध करावी, अशी या मार्गातील गावांमधील नागरिकांची मागणी आहे. यामुळे नागरिकांना पुढचे धोरण आखता येईल.(वार्ताहर)