शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

बावनथडी प्रकल्पाचे काम कालबद्ध वेळेत पूर्ण करा

By admin | Updated: September 13, 2015 00:34 IST

राज्यातील खोळंबलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन आवश्यक निधीची उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने प्रकल्पाच्या निरिक्षणाकरिता अंदाज समितीला पाठविले.

समितीने घेतला आढावा : बावनथडी संघर्ष समितीने अंदाज समितीला सोपविले निवेदनतुमसर : राज्यातील खोळंबलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन आवश्यक निधीची उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने प्रकल्पाच्या निरिक्षणाकरिता अंदाज समितीला पाठविले. यावेळी बावनथडी संघर्ष समितीच्यावतीने समितीचे स्वागत करून बावनथडीचे काम कालबद्ध वेळेत पुर्ण करण्यासंबंधी निवेदन दिले.धरणात साठविलेल्या पाण्याचा साठा १०० टक्के क्षमतेपर्यंत होईल या दृष्टीने आवश्यक उपाय योजना करावी, बावनथडी प्रकल्पामुळे अंदाजे १७,००० हेक्टर भूमीसिंचनाची अपेक्षा असून त्याकरिता १,००० आऊटलेट गरज असून उपवितरीकेची तात्काळ निर्मिती करणे, विस्थापितांचे १०० टक्के पुनवर्सन व सोयी सुविधासह जमिनीचा मोबदला देण्यात यावा. तसेच प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या भिती २५ ते ३० वर्ष जुनाट असून कालव्यात जंगली रोपट्यांची लागवड झाली. त्यावरील जीर्ण पुलांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, मुख्य कालव्यातून तुमसर तालुक्यातील खापा, मांगली, सुकळी, मांढळ, देव्हाडी, सिवनी, कोष्टी, बाम्हणी इत्यादी गावातातील अंतिम टोकापर्यंत पाणी पोहचत नाही त्यात तांत्रिक दृष्ट्या उपवितरिकेचे निर्माण झाले नसल्याने व आवश्यक उतार मिळत नसल्याने पाणी पोहचत नाही त्या करिता उपाययोजना करावी, बावनथडी प्रकल्पाचे कार्यालय गोंदिया येथे आहे. वास्तविक पाहता प्रकल्पापासून १२५ कि.मी. अंतरावर कार्यालय असल्याने आवश्यक कामे करण्यासाठी जास्त वेळ व पैसा खर्च होत असल्यामुळे कामांत दिरंगाई होत आली असून प्रकल्पाची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. पुर्वी चार उपअभियंता कार्यालये होती आता दोन उपअभियंता कार्यालये शिल्लक असून अधिकारी नाही. परिणामी प्रकल्पाच्या कामात अडथळा होत आहे. गोंदिया येथील कार्यालयाचे तुमसरात स्थलांतर करावे, आवश्यकतेप्रमाणे शाखा कार्यालयाची स्थापना करून कालबद्ध वेळेत बावनथडी प्रकल्प पुर्णत्वास आणण्याची मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तारीक कुरैशी, सचिव टाटा लांजेवार यांनी अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतेकर यांना केली. (शहर प्रतिनिधी)