शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 00:22 IST

इंदिरा सागर महत्त्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे बोगद्याचे काम शिल्लक कामे पूर्ण झाली असून धरणाची पातळी २४१.२०० मीटर आहे.

धरणाची पातळी २४१.२०० मीटरवर : दोन वक्रद्वारे उघडली, डाव्या, उजव्या कालव्यात पाणी सोडलेप्रकाश हातेल । लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : इंदिरा सागर महत्त्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे बोगद्याचे काम शिल्लक कामे पूर्ण झाली असून धरणाची पातळी २४१.२०० मीटर आहे. डावा, उजव्या दोन्ही कालव्यात पाणी सोडले असून धरणाची दोन वक्रद्वारे अर्ध्या मीटरने उघडले आहेत.२२ एप्रिल १९८८ मध्ये गोसे धरणाची निर्मिती झाली पायथ्याजवळ पाणी वाहुन जाण्याकरिता चार भुमिगत बोगदयाची ‘कडूळ’ निर्मिती करण्यात आली होती आज हे प्रकल्पपूर्ण पणे तयार असून शासनाने पाणी अडविल्याची भुमिका घेतल्याने सर्वत्र जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाचे २४२ मीटरचा दुसरा टप्पा अर्थात २० टीएमसी उद्दिष्ट पूर्ण केले गेले होते. यावर्षी त्यात वाढ करुन २४२.५०० मीटरपर्यंत जलसाठा साठविण्यात येणार आहे. मात्र धरणाच्या गेट क्रमांक ८, ९, १० वरील चार भूमिगत बोगदे बंद करावयाचे असल्याने धरणातील जलसाठा टप्पाटप्प्याने कमी केले होते. तर धरणाचे ३३ वक्रद्वारे बंद केले असून आवश्यकतेनुसार पाणी ८ ते १० दिवसानी सोडले जात होते व कंडूळ बोगद्याचे कामे वक्रद्वाराने पाणी अडवून बोगद्याची कामे युध्दपातळीवर सुरु होती. ते चारही (कंडूळ) बोगद्याची कामे पुर्ण झाली असून धरणाची गेट क्र. १ व ३३ अर्ध्या मिटरने उघडले आहेत. सध्या स्थितीत प्रकल्पात पाण्याचा साठा २४१.२०० मीटर आहे. गेल्या पंधरा दिवसापासुन पावसाने दडी मारल्याने रोवणी पावसाअभावी रखडल्याने प्रकल्पाच्या डावा व उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. गोसे प्रकल्पाच्या पाण्यावर वीज निर्मिती करणाऱ्या पॉवर हाऊसची कामे अंतीम टप्प्यात आली असून धरणाच्या पोटातील कामे सुरु आहेत त्या पॉवर हाऊसच्या कामासाठी पुन्हा पाण्याची पातळी कमी करण्यात येणर आहे. पावर हॉऊसची पूर्ण कामे झाल्यावर डिसेंबर २०१७ ला धरणाचे संचयन पातळी गाठणार आहे.रोवणी होईपर्यंत कॅनल सुरु ठेवागोसेखुर्द परिसरातील १० किमी पर्यंतच्या गावाला या प्रकल्पात शासनाने पाणी अडविणे सुरु केले तेव्हापासून अल्प पाऊस पडत असल्याने चार वर्षा पासुन निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची रोवणी होत नाही आहेत. त्यामुळे डाव्या कालव्यात सोडलेले पाणी रोवणी होईपर्यंत बंद करु नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यात अश्रूधरणाची कामे होताच पाणी अडविण्याची भुमिका शासनाने घेतली नदी काठावरील प्रकल्पग्रस्तांना गावे सोडावी लागली. मात्र बोगदयाचे कामाला धरण खाली केल्याने जुने गावाचे दर्शन झाले असून गावातील रस्ते, मंदिरे, चौकटीवरील वटवृक्ष पडलेली घरे या गावात गेलेले बालपण जुन्या आठवणी निर्माण करित असून प्रकल्पग्रस्तांची डोळे पाणावली आहेत. पुन्हा शासनाने पाणी साठवणूक केल्याने आठवणीवर पांघरुन झाकले गेले आहे.