शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

By admin | Updated: August 7, 2016 00:21 IST

जलयुक्त शिवार अभियान योजनेचा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश : जलयुक्त शिवारचा आढावाभंडारा : जलयुक्त शिवार अभियान योजनेचा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा घेतला. २०१५-१६ ची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. त्याचप्रमाणे अतिरिक्त कामे सुचवायची असल्यास १२ आॅगस्ट पर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावे, अशा सूचना त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या.या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. नलिनी भोयर, उपवन संरक्षक यु. यु. वर्मा, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, दिलीप तलमले, शिल्पा सोनाले व उपसंचालक माधूरी सोनोने उपस्थित होते.या बैठकीत २०१५-१६ मध्ये निवड केलेल्या ८६ गावातील अतिरिक्त कामे, विशेष निधी व सीएसआर निधी अंतर्गत पूर्ण झालेली कामे व प्रलंबित देयके, २०१६-१७ मध्ये वन विभाग व ग्रामपंचायत यांचा सुधारित आराखडा, २०१५-१६ मध्ये ८६ गावातील यंत्रणानिहाय पूर्ण केलेल्या विविध कामामुळे निर्माण झालेला पाणी साठा व उपलब्ध झालेले संरक्षित सिंचन, यंत्रणानिहाय मोबाईल फोटो अपलोडींग अहवाल, २०१६-१७ मध्ये प्रशासकीय मान्यता घ्यावयाची प्रस्तावित कामे, २०१५-१६ मध्ये यंत्रणानिहाय रद्द कामाची कारणासह यादी, महात्मा जलभूमी अभियानांतर्गत वाटप केलेला निधी व खर्चाचा आढावा, महात्मा भूमी जलभूमी अभियानांत तूटफुट दुरुस्ती करता निधी मागणी व वनराई बंधारा नियोजन या विषयाचा आढावा घेण्यात आला.२०१५-१६ चे अतिरिक्त कामाचे प्रस्ताव १२ आॅगस्टपर्यंत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. ज्या गावात एका यंत्रणेने सिमेंट नाला बांध प्रस्तावित केले असेल त्या गावात दुसऱ्या यंत्रणेने सिमेंटनाला बांध प्रस्तावित करु नये असे ते म्हणाले. सिमेंट नालाबांधची कामे प्रस्तावित करतांना भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून सर्वेक्षण करुन घ्यावे.विशेष निधीमधून बचत असल्यास ती कामे सुध्दा १२ आॅगस्टपर्यंतच प्रस्तावित करावी.२०१६-१७ च्या प्रस्तावित कामासाठी १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ठराव मंजूर करुन घ्यावेत. जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ठ असलेल्या प्रत्येक गावातील पात्र लाभार्थ्यांना सिंचन विहिर घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.दुरुस्तीचे कामे करतांना एकाच कामाची वारंवार दुरुस्ती होऊ नये याची काळजी यंत्रणांनी घ्यावी. जलयुक्त शिवारमध्ये पंचायत विभागाने मजगी व विहिर पुर्नभरणाचे काम प्रत्येक गावात घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीला सर्व विभागाचे प्रमुख व त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती. (नगर प्रतिनिधी)