शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारकर्त्या महिलांविरोधात केला गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:50 IST

वादळ, पावसामुळे रोहित्रावरील तार तुटल्याची तक्रार महावितरण विभागाला केल्यावरुन शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करुन पोलिसात गुन्हा नोंद केला. महावितरणने मोकळा श्वास घेत गत तीन महिन्यांपासून 'ते' जिवंत विद्युत तार जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता बळावल्याचा प्रकार गोबरवाही येथे घडला आहे.

ठळक मुद्देगोबरवाही येथील महावितरण विभागाचा प्रकार : तीन महिन्यांपासून जीवंत विद्युत तारा लोंबकळतच

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वादळ, पावसामुळे रोहित्रावरील तार तुटल्याची तक्रार महावितरण विभागाला केल्यावरुन शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करुन पोलिसात गुन्हा नोंद केला. महावितरणने मोकळा श्वास घेत गत तीन महिन्यांपासून 'ते' जिवंत विद्युत तार जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता बळावल्याचा प्रकार गोबरवाही येथे घडला आहे.तालुक्यातील गोबरवाही येथील रेल्वे क्रॉसींग नजिक रेणुका लेकचंद मोहनकर यांची ४२ आर शेती आहे. शेतातच त्यांचे राहते घरही आहे. घरात एकूण १० व्यक्ती राहतात. त्या १० व्यक्तींमध्ये सात महिला आहेत. त्यांच्या शेतात एक रोहित्र व सहा खांब आहेत. ११ फेब्रुवारी २०१८ ला वादळासह जोरदार पाऊस पडल्यामुळे डिपीवरुन विद्युत तारांचे कनेक्शन तुटले. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयात रितसर लेखी तक्रारीची नोंदणीही तक्रार नोंदणी रजिस्टरवर केली होती. दरम्यान पाच दिवसानंतर विद्युत विभागाचे टवाळखोर कर्मचारी तिथे गेले असता त्यांनी व तिथे राहणाऱ्या मुलींची छेड काढली. त्यांना खडेबोल सुनावित वारंवार तुम्ही तक्रारी करता असे म्हणून ते निघून गेलेत. उलट विद्युत अभियंता यांनी तिथे राहणाºया रेणुका मोहनकर, मिनाक्षी मोहनकर, सिमा मोहनकर व हिरा मोहनकर यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी भादंवी ३५३, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला.दरम्यान घटनेसंबंधीची माहिती लोकप्रतिनिधीनांही देण्यात आली. परंतु अद्यापर्यंत कर्मचाºयांवरील कारवाईचे तर सोडाच ते पडलेले विद्युत तारही जोडण्यात न आल्याने तिथे जिवीत हानी होण्याची महावितरण विभाग वाट तर बघत नसावे ना? असा संतप्त सवाल पिडितांनी लोकमतशी बोलतांनी सांगितले.या घटनेसंदर्भात गोबरवाही येथील सहायक अभियंता अरविंदकुमार पंधरे यांची प्रतिक्रीया घेण्याकरिता दुरध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.महावितरण विभागातील कर्मचाºयांनी आपले दृष्कर्म लपविण्यासाठी पोलिसांत खोटी तक्रार केली आहे. याबाबद उर्जामंत्र्यांनाही दोनदा निवेदन देण्यात आले. परंतु अद्यापही विद्युत तारांची जोडणी झाली नाही, याला काय म्हणावे.- सुनिता मोहनकरजिल्हाध्यक्षा, क्रांतीदल सेना, तुमसर