शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

स्पर्धा, अभ्यासात्मक दृष्टिकोनातून विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2017 00:24 IST

समाजाच्या सर्वांगिण विकासाकरिता स्पर्धात्मक दृष्टी जपा. कष्टाने मुलांना घडवा, स्पर्धा खूप मोठी असल्याने अभ्यासाची दृष्टी व्यापक ठेवा.

नाना पटोले यांचे प्रतिपादन : झाडे कुणबी समाजाचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा भंडारा : समाजाच्या सर्वांगिण विकासाकरिता स्पर्धात्मक दृष्टी जपा. कष्टाने मुलांना घडवा, स्पर्धा खूप मोठी असल्याने अभ्यासाची दृष्टी व्यापक ठेवा. ओबीसी स्वतंत्र मंत्रालयाने आम्हाला न्याय निश्चित मिळेल. राज्य सरकार प्रमाणेच केंद्र सरकारला सुद्धा स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापनेची विनंती केली आहे. सामाजिक व्यवस्थेला उभारी मिळण्याकरिता स्वत: प्रामाणिक राहून तुम्हालाही मेहनत घ्यायची आहे असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. झाडे कुणबी समाज कौटुंबिक स्नेहसंमेलनात ज्योतिबा फुले कॉलनीतील पटांगणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, शुभांगी मेंढे, प्रा.हरिभाऊ पाथोडे, रुपजी कोरे, नामदेव चुटे, नवनिर्वाचित नगरसेवक वनिता डोये आदी उपस्थित होते.यावेळी पटोले यांनी, भंडाऱ्याच्या विकासाकरिता शेजारील भोजापूर, गणेशपूर, खोकरला आदी ग्रामपंचायतीला नगरपालिकेत समायोजन करून विकासात्मक निधी आणण्याकरिता मोठी मदत होईल. शहराची विकासगंगा प्रवाहित राहण्याकरिता सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. भेल ला १००० मेगावॅटची क्षमता वाढवून कॅबीनेटची परवानगी मिळाली आहे. यात स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी या वर्षापासून मिळणार आहेत. प्रा. हरिभाऊ पाथोडे यांनी, समाजबांधवांना प्रेरीत करण्याकरिता अनेक अभ्यासाचे पैलू विस्तृत विवेचन केले. त्यांचा नितीश पाथोडे हा मुलगा युपीएससी परीक्षेत कसा यशस्वी झाला. त्याकरिता विद्यार्थ्यांनी कसे अभ्यास केले पाहिजे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.प्रास्ताविकेतून समाजाचे अध्यक्ष पांडुरंग फुंडे यांनी, समाजाच्या विकासाकरिता प्रत्येकांनी जबाबदारी सांभाळावी. समाजाच्या विकासात सर्वांचेच श्रेय महत्वाचे आहे. इंदिरा सागर प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना न्याय द्यावा. हक्क सोडण्याविषयी व आपसी बटवाऱ्याकरिता महसूल व नोंदणी कार्यालयात शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. ही पद्धत बदलून एकाच कार्यालयात सहजतेने कमी खर्चात कामे करावे अशी मागणी ठेवली. यावेळी १० व १२ वी च्या प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांत तेजस्वीनी तरोणे, मोहनीश खोटेले, मृणाल शिवणकर, काजल फुंडे, फाल्गूनी फुंडे, निशांत फुंडे, मृणाली हुकरे, वेदांती पटोले, मोहिनी दोनोडे, ज्योत्स्ना कोरे, हितेंद्र पागोटे, चिन्मय चुटे यांचा सन्मान करण्यात आला. मुलींनी आकर्षक रांगोळ्या घालून समाजबांधवांचे लक्ष खेचले. हितेंद्र पागोटेचा प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत स्मार्ट फोनचा सकारात्मक दृष्टीने वापर करण्याचा सल्ला दिला. नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी, समाजबांधवांना मुलांना साकारण्याचे आव्हान केले. मातापित्यांनी जबाबदारी सांभाळत नेऊन मुलं घडवा अशी सूचना शुभांगी मेंढे यांनी दिल्या. वेषभूषा, रंगीबेरंगीने छोटे सरकार पुढ्यात असल्याने मंडपाची व कार्यक्रमाची रंगत न्यारी ठरली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. समाजाच्या विकासनिधीत भरीव मदत करणाऱ्यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. खा. पटोले यांच्या विकासनिधीतून २५ लक्ष रुपयाच्या सभागृहाच्या बांधकामाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. वधू वर परिचय कार्यक्रम यशस्विपणे पार पडला. संचालन सारिका दोनोडे यांनी केले. आभार निता चुटे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्योती ब्राम्हणकर, परिनिता फुंडे, मोहिनी पाथोडे, इंदिरा ब्राम्हणकर, शरद कोरे, महिंद्रा कठाणे, अरुण शिवणकर, गजानन शिवणकर, प्रकाश शिवणकर, प्रा.घनश्याम चुटे, अशोक चुटे, राजेंद्र डोये, हिरालाल ब्राम्हणकर आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)