शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

कलर्स आणि लोकमततर्फे सखींसाठी गुरुवारी ‘लावणीत पहा, एक वेगळं गठबंधन’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:13 IST

आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी, व्यवसाय यात तीचा दिवस कसा सरतो तीचे तिलाच समजत नाही. अशा तिच्या धावपळीच्या जीवनात थोडा विसावा, मनोरंजनाची संधी द्यावी, मराठी कलेचे अविभाज्य अंग असलेल्या लावणी कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने लोकमत सखी मंच व कलर्स वाहिनी यांच्यावतीने सदस्यांसाठी शुक्रवारी (११ जानेवारी) ‘लावणीत पहा एक वेगळं गठबंधन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमनोरंजनाची मेजवानी : वैशाली सावंत यांचे बहारदार नृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी, व्यवसाय यात तीचा दिवस कसा सरतो तीचे तिलाच समजत नाही. अशा तिच्या धावपळीच्या जीवनात थोडा विसावा, मनोरंजनाची संधी द्यावी, मराठी कलेचे अविभाज्य अंग असलेल्या लावणी कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने लोकमत सखी मंच व कलर्स वाहिनी यांच्यावतीने सदस्यांसाठी शुक्रवारी (११ जानेवारी) ‘लावणीत पहा एक वेगळं गठबंधन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.वैशाली सावंत यांचा महाराष्ट्रातत गाजत असलेला, दिलखेचक अदाकारीने सजलेला, नटलेला जल्लोषमय कार्यक्रम अर्थात ‘नाद करायचा नाय’ हा लावणी कार्यक्रम या दिवसाचा आकर्षण बिंदू असणार आहे. भंडारा येथील खात रोड स्थित मंगलमुर्ती सभागृहात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मोठ्या संख्येने सखींनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी सखी मंच सदस्यत्व ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. यासाठी कार्यक्रमस्थळी नवीन सभासद नोंदणी उपलब्ध असणार आहे. प्रथम येणाºयांना प्रथम प्रवेश या तत्वानुसार प्रवेश दिला जाणार आहे.या कार्यक्रमात लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही असे कळविण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), ललीत घाटबांधे (९०९६०१७६७७), शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९८५०३०४१४३) यांच्याशी संपर्क साधावा.मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देऊन लहान पडद्यावर आपल्या नावाच्या रंगाची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचे रंग टिपून त्या भावनेचे एक वेगळ्या रंगात सिरियल्सद्वारे सादरीकरण करून कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पुन्हा एकदा एक नवी प्रेमकथा ‘गठबंधन’ ही मालिका कलर्स चॅनलवर १५ जानेवारीपासून प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रदर्शित होणार आहे. ही कथा महाराष्ट्रातल्या डोंबीवलीत राहणाऱ्या व गुंडगिरी करणाऱ्या २४ वर्षीय रघुभाऊ व आयपीएस अधिकारी होण्याची स्वप्न बाळगणाऱ्या निर्भिड, दृढ आणि महत्वाकांक्षी अशा गुजरातमधील धनक या तरुणीची. बऱ्याचदा अनपेक्षित आणि अनोळखी ठिकाणी सापडणाऱ्या प्रेमात आपणाला कधीही उणीव किंवा त्रुटी भासत नाही. रघुभाऊ हा जाधव घराण्यातील मुलगा दहावी पास झालेला असतो. आई सावित्रीबाईच्या सावकारी व खंडणी व्यवसायात तो मदत करत असताना ‘जिओ लाईफ तो अपुन के स्टाईल में..’ असे म्हणत तो जीवन जगत असतो. त्याचा प्रेमावर विश्वास नसतो. कारण प्रेम आपल्याला कमकुवत आणि दुर्बळ बनविते, असे त्याला वाटते. त्यामुळे तो प्रेमाचा नेहमीच द्वेष करतो. एकिकडे गुजरातमध्ये राहणारी २३ वर्षीय मुलगी धनक ही आयपीएस अधिकारी बनण्याची महत्वकांक्षा ठेवत असतानाच आपल्याला हवे ते मिळाले पाहिजे, त्यासाठी तिची कठोर परिश्रम करण्याची तयारी असते. कालांतराने ती मुंबईला जाते. तिथे तिला रघु भेटतो व तिला पहाताच त्याला ती आवडते. आणि यासाठी तिच्यासोबत मैत्री करण्याची आपल्या मित्रासोबत पैजही लावतो. याच मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमामध्ये होते. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रेमाचं एक आगळं-वेगळं रसायन पहायला मिळतं. एक गुंड व आयपीएस अधिकाऱ्याची ही कथा म्हणजेच ‘गठबंधन’ १५ जानेवारीपासून प्रत्येक सोमवारी ते शुक्रवारी रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.