शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सर्दी, खोकला होताच उभा राहतोय नागरिकांच्या अंगावर काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 11:25 IST

कोरोनाच्या धास्तीने साधी सर्दी, खोकला झाला तरी अंगावर काटा उभा राहतो. डॉक्टरकडे जायचीही भीती वाटते. अनेक जण अशा स्थितीत घरगुती उपाय करून अंगावर आजार काढताना जिल्ह्यात दिसत आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाची धास्ती वातावरणातील बदलाने संसर्गजन्य आजारात वाढ

संतोष जाधवर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वातावरणातील बदलाने अनेकांना सर्दी, खोकला, अंगदुखीसह तापाची लक्षणे जाणवत आहे. कोरोनाच्या धास्तीने साधी सर्दी, खोकला झाला तरी अंगावर काटा उभा राहतो. डॉक्टरकडे जायचीही भीती वाटते. अनेक जण अशा स्थितीत घरगुती उपाय करून अंगावर आजार काढताना जिल्ह्यात दिसत आहे. दवाखान्यात जावे तर कोरोना तपासणीची धास्ती आणि नाही जावे तर प्रकृती आणखी खालावते काय, याची चिंता.

भंडारा जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना बाधितांचा आकडा तीन हजार ७३६ वर शनिवारी पोहचला होता. तर ८० जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. अशातच वातावरणातील बदलाने विषाणूजन्य आजारांची लागण झाली आहे. तसेही दरवर्षी या महिन्यात सर्दी, ताप, खोकला होताच. त्यावर रुग्णालयात जावून उपचारही केला जातो. परंतु यावर्षी स्थिती वेगळी आहे. साध्या शिंका यायला सुरूवात झाली तर मनात नाना शंका घर करून बसतात. सर्दी आणि खोकला झाला तर भीतीत भर पडते आणि ताप आला तर कुठेतरी आपण कोणाच्या संपर्कात तर आलो नाही ना याचा दहादा विचार सुरू होतो. याचे कारण म्हणजे सध्या कोरोना संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव होय.

याच कारणाने अनेक जण अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला झाला तरी अंगावरच काढत आहे. एकीकडे सोशल मीडियातून कोरोनावर नीट उपचार होत नसल्याची ओरडच आहे. खासगी रुग्णालयात जावे तर अनेक डॉक्टरांचे दार बंद असते. विनंती केल्यानंतर तपासणी करायची म्हटले तरी आधी कोरोना टेस्टचा आग्रह केला जातो. हे सर्व माहित असतानाही नियमांचे पालन मात्र कुणी करताना दिसत नाही. मास्क वापरणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे केले आहे. प्रशासनाने दंडाची तरतूद केली आहे. त्यानंतरही अनेक जण मास्कशिवाय फिरताना दिसून येत आहे.

जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यासाठी माझे कुटुंब सुरक्षित कुटुंब मोहीम राबविली जात आहे. यासोबत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्हा रुग्णालयासह कोविड केअर सेंटरला भेट देवून तेथील पाहणी केली. प्रशासन गांभीर्याने कोरोना निर्मूलनासाठी प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र त्याला तडे देताना दिसत आहे. जिल्ह्यात गावागावांत जनता कर्फ्यू आयोजित करूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत कुठे घट होताना दिसतस नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नागरिक बिनधास्तपणे आजही फिरताना दिसून येतात.वैद्यकीय उपचार महत्वाचेकोणत्याही आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच त्यावर वैद्यकीय उपचार करणे गरजेचे आहे. अलिकडे अनेक जण दुखणे अंगावर काढताना दिसत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य साथ निर्माण झाली आहे. भंडारा शहरात आलेल्या पुरामुळेही अनेक जण आजारी पडले आहेत. अशा स्थितीत रुग्णांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबतच आजाराची लक्षणे दिसतातच तपासणी करणे महत्वाचे आहे. यासोबतच पुरेशी झोप, दैनंदिन योग प्राणायम, गरम पाणी प्राशन, बाहेरचे खाणे टाळणे, फल आहार वाढविणे आणि कुटुंबात आनंदी राहणे आवश्यक असल्याचे येथील साई क्लिनिकचे डॉ. दिलीप गुरीपुंजे यांनी सांगितले आहे. मनात कोणतीही शंका आली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणालेघरगुती उपचारावरच भरविषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरज असते. परंतु शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे जाण्यासाठी अनेक जण टाळतात. तर खाजगी रुग्णालयात डॉक्टर प्रतिसाद देत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळेच आता अनेक जण घरच्या घरीच उपचार करताना दिसतात. विविध वनस्पतींचा काढा, हळदीयुक्त दूध, निंबू पाणी, मिठाच्या पाण्याच्या गोळ्या, अद्रकाचा चहा घेण्यावर नागरिकांचा भर आहे. घरातील एक जण आजारी पडला की दुसराही आजारी पडतो. त्यामुळे कोरोनाची धास्ती वाढत आहे. अशा स्थितीत नागरिकांनी लक्षणांना न घाबरता थेट डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार करण्याची खरी गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस