शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बोचऱ्या थंडीची चाहूल; गावोगावी पेटल्या शेकोट्या

By admin | Updated: November 14, 2016 00:32 IST

जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची चाहूल सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या बोचऱ्या थंडीमुळे अनेकांना हुडीहुडी भरली आहे.

ऊनी कापडाची दुकाने सजली : स्वेटर, मफलर, जर्किन निघाले कपाटाबाहेरभंडारा : जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची चाहूल सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या बोचऱ्या थंडीमुळे अनेकांना हुडीहुडी भरली आहे. येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात चौकाचौकांत शेकोट्या पेटण्यासाठी सुरूवात झाली आहे. अनेक नागरिक मफलर व स्वेटरचा वापर सुरू झाला आहे. मागील काही दिवसांत दक्षिणमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडील हवेचा प्रभाव कमी असून येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर हा बोचऱ्या थंडीचा महिना मानला जातो. साधारणत: दरवर्षी दिवाळीनंतर बोचऱ्या थंडीला सुरूवात होते. मात्र दोन ते तीन दिवसांपासून थंडी वाढली आहे. सायंकाळ होताच वातावरणात गारवा जाणवू लागतो. थंडी आरोग्याला लाभदायक असते. थंडीमुळे फुलझाडांना, फळझाडांना बहर येतो. थंडीपासून बचाव करण्यासाठी लहान थोर मंडळी स्वेटर, जर्किन, मफलर टोपी, चारदर, घोंगडी याचा उपयोग करताना दिसून येत आहे. वाढत्या थंडीमुळे लोक अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवत आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी रबी पेरणीचा हंगाम सुरू झाल्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देत आहे. त्यामुळे थंडीमुळे गरम कपड्यांची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागाचा विचार करता ही थंडी ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलणारी ठरेल, अशी आशा निर्माण झाली आहे. जेवढी थंडी जास्त तेवढा रबीचा हंगाम उत्तमरीत्या येऊ शकतो, असा बळीराजाचा अनुभव आहे. दुकाने सजलीशहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी उनी कापडांची दुकाने थाटली आहेत. थंडीत वाढ होत असल्याने या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे.(प्रतिनिधी)