शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोका अभयारण्य ठरले वन्यजीवांसाठी नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:54 IST

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्य ११० चौरस कि.मी. क्षेत्रात विस्तारलेला आहे. पर्यटनासाठी अभयारण्य प्रशासनाने ५२ किमीची जंगल सफारी तयार केली आहे. डोंगरदऱ्यातील चढ-उतार, खोल दऱ्या, वळणदार रस्ते व उंच झाडांनी नटलेले अभयारण्यात सफारीसाठी विदर्भातून पर्यटकांचा ओघ वाढला आहे. अभयारण्यात वन्यप्राणी प्रगणना झाली असून बिबट, ...

ठळक मुद्देपर्यटकांचा वाढला ओघ : तृणभक्षक व हिंस्र प्राण्यांची संख्या वाढली

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्य ११० चौरस कि.मी. क्षेत्रात विस्तारलेला आहे. पर्यटनासाठी अभयारण्य प्रशासनाने ५२ किमीची जंगल सफारी तयार केली आहे. डोंगरदऱ्यातील चढ-उतार, खोल दऱ्या, वळणदार रस्ते व उंच झाडांनी नटलेले अभयारण्यात सफारीसाठी विदर्भातून पर्यटकांचा ओघ वाढला आहे. अभयारण्यात वन्यप्राणी प्रगणना झाली असून बिबट, अस्वल, रानगवा, चौसिंगा, निलगाय, चितळ आदी २० प्रकारच्या १,०६५ वन्यजीवांच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. वन्यप्राण्यांच्या दर्शनामुळे कोका वन्यजीव अभयारण्य वन्यजीवांसाठी नंदनवन ठरले आहे.कोका वन्यजीव अभयारण्यात पर्यटन वाढीसाठी वन्यजीव प्रशासनाकडून विविध सुविधा करण्यात आले आहेत. याशिवाय हॉटेल, खानावळींची सुविधा ग्रामस्थांच्या माध्यमातून पुरविली जात आहे. पर्यटकांच्या विश्रांतीसाठी टेकडीवर इंग्रजकालीन कोका वनविश्रामगृहाचा कायापालट करण्यात आला असून वातानुकुलीत करण्यात आले आहे. आसाम पॅटर्नचे बांबूची राहुटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या अभयारण्यात वन्यजीवांचा अधिवास वाढावा, यासाठी वनविभागाने हिरवे कुरण, फळ झाडांची लागवड करण्याबरोबर विश्रांतीसाठी थांबे देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसात भटकंती करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सौर ऊर्जेवरील हातपंप, पाणवठे, नैसर्गिक तलावांचे खोलीकरण करण्यात आले आहे. बफर झोनमध्ये वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष दिले जात असल्यामुळे शिकारींचा बंदोबस्त व वनातील आगींकडे लक्ष देण्यात येत असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होत आहे.बौद्ध पौर्णिमेला झालेल्या प्रगणनेत बिबट ६, अस्वल ३३, ससा १, गवे ७८, रानडुक्कर २६४, चितळ २५५, नर निलगाय १४, निलगाय मादी व बच्चे २३, रानकुत्रे ४९, सांबर १२, मोर ९५, भेंडकी २०, मुंगूस २, सायाळ २, वानर २०२, रानमांजर २, मसण्याऊद ४, चौसिंगा २, खवल्या मांजर १ असे एकूण १०६५ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.वन्यजीवांना आवश्यक ते नैसर्गिक वातावरण कोका वन्यजीव अभयारण्यात आहे. सुविधा पुरविण्यात येत असल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत व वन्यजीवांच्या संख्येत वाढ झाली आहे.-आशुतोष शेंडगे,वनपरिक्षेत्राधिकारी कोका.

टॅग्स :forestजंगल