शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी साधला पालकमंत्र्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

साथरोगाला प्रतिबंध, नागरिकांची सुरक्षितता व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यादृष्टीने जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांच्याकडून चांगले प्रयत्न होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील उपाययोजनांच्या अनुषंगाने निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा दिली. जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी आरोग्य, महसूल व विविध यंत्रणा सुसज्ज आहेत.

ठळक मुद्देकोरोना : संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांबाबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील कार्यवाहीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा केली व माहिती जाणून घेतली.साथरोगाला प्रतिबंध, नागरिकांची सुरक्षितता व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यादृष्टीने जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांच्याकडून चांगले प्रयत्न होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील उपाययोजनांच्या अनुषंगाने निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा दिली. जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी आरोग्य, महसूल व विविध यंत्रणा सुसज्ज आहेत. परदेशातील तसेच मुंबई-पुण्याहून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यांना होम क्वारंटाइनबाबत निर्देश देण्यात आले आहेत. वैद्यकीय पथकांमार्फत त्यांच्याशी नियमित संपर्क होत आहे. आवश्यक वाटल्यास नागरिकांचे थ्रोट स्वॅब घेण्यात येत आहेत. जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह व्यक्ती नाही. आवश्यकता भासल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम परिसर येथे क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. संचारबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा होण्यासाठी जिल्ह्यातील उत्पादक, विक्रेते, वितरक यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून पालकमंत्र्यांनी त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या व त्यांना सहकार्य करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांच्याकडून पालकमंत्र्यांकडून विविध बाबींची माहिती वेळोवेळी घेतली जात आहे. नागरिकांच्या शंका-समाधानासाठी व त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वत:च्या निवासस्थानाचा लँडलाइन फोनही हेल्पलाइन नंबर म्हणून उपलब्ध करून दिला आहे. तीन जणांचे पथकही त्यासाठी नियुक्त केले आहे. याबाबत माहिती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेदरम्यान दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYashomati Thakurयशोमती ठाकूर