शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

'आॅनलाईन'च्या विरोधात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:02 IST

आॅनलाईन कंपन्यांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील औषधी विक्रीच्या दुकानासह संपूर्ण बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद होती. व्यापाऱ्यांनी मोटरसायकल रॅली काढून शासनाच्या धोरणाचा निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. भंडारा शहरासह तालुक्यातही या बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन : शहरातून काढली मोटरसायकल रॅली, तालुका ठिकाणीही उत्तम प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आॅनलाईन कंपन्यांच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील औषधी विक्रीच्या दुकानासह संपूर्ण बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद होती. व्यापाऱ्यांनी मोटरसायकल रॅली काढून शासनाच्या धोरणाचा निषेध करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. भंडारा शहरासह तालुक्यातही या बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला.आॅनलाईन कंपन्यांमुळे किरकोळ आणि ठोक व्यापार संकटात आले आहे. आॅनलाईन कंपन्यांना सरसकट परवानगी देण्याच्या विचारात सरकार असून या बाबीचा भंडारा व्यापारी संघाने शुक्रवारी तीव्र विरोध दर्शविला. आॅनलाइन कंपन्याच्या विरोधात आज औषधीसह संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. किराणा, कपडा, इलेक्ट्रॉनीक्स, आॅटोमोबाइल, इलेक्ट्रीक, तसेच इतर व्यापाºयांनी शुक्रवारी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून या धोरणाला कडाडून विरोध दर्शविला. भंडारा जिल्हा व्यापारी संघासह औषधी विक्रेता संघातर्फेभंडारा शहरातील जलाराम सभागृहात सर्व व्यापारी संघांची संयुक्त बैठक घेण्यात आली.यावेळी ५०० पेक्षा जास्त व्यापाºयांनी सहभाग नोंदविला. यानंतर शहरातून दुचाकी रॅली काढीत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी आंदोलनाचे संयोजक निकेत क्षीरसागर, नितीन दुरगकर, संजय निंबार्ते, सोनू कुरंजेकर, संजय खत्री, मनोज संघानी, राहुल निर्वाण, जयेश संघानी, अनिल मल्होत्रा, कमल भोजवानी, मधु वाघाडे, पवन पेशने, दिलीप शहारे, आनंद ठकराल, सुरेश मनवानी, पिंटू इसरानी, नरेंद्र मोहबे, वैभव अडिया, संजय उमाळकर, राजू भोजवानी, जेठालाल हुंदानी, श्याम खुराना, केशव हुंदानी आदि उपस्थित होते. संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद असल्याने अनेकांना याचा फटका बसला.साकोलीत बंदला यशसाकोली : तालुक्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद व्यापारांकरवी लाभला. साकोली शहरातील सर्वच औषधी दुकाने बंद होती. यावेळी असोसिएशनचे हिरालाल पारधीकर, बलराजसिंह नंदेश्वर, प्रकाश गजापुरे, सुभाष पटले, रूपम गुप्ता, शरद गुप्ता, अरविंद डुंभरे, शिवशंकर बावनकुळे, शरद राऊत आदी उपस्थित होते.पवनीतही कडकडीत बंदपवनी : शासनाने औषधी विक्रेत्यांना वेठीस धरले आहे. आॅनलाईन औषध विक्रीला परवानगी देणे, अनैसर्गीक प्रतिस्पर्धा निर्माण करणे, औषधांचा अभाव असणे या सर्व बाबी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे होत आहे. याचाच निषेध म्हणून पवनीतही औषध विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाडला. महात्मा गांधी चौकातून रॅलीची सुरूवात करण्यात आली. यात अन्य व्यापाºयांनीही सहभाग घेतला.मोहाडीत दिले निवेदनमोहाडी : मोहाडीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाडून तहसीलदार यांच्या मार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन पाठविले. यावेळी टेलिकॉम संघटनेचे विक्रम साखरकर, अनिल चिंधालोरे, सिराज शेख, अरविंद निखारे, अफरोज पठान, आशिष पराते, सुरेश वडदकर, विलास वाडीभस्मे, हेमंत मेहर, चैतन्य करंजेकर, रंजन ढोमणे, जगदिश पाटील, सुरेश पाटील, शशिकांत पाटील, स्वस्तीक निमजे, रविशंकर निमजे, मोहन पराते, विठ्ठल महालगावे, प्रभाकर उपरकर, पद्माकर गभने, शेंद्रे, खोब्रागडे, विनोद बडवाईक आदी उपस्थित होते. आंधळगाव येथेही व्यापाऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी गावातून व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.