शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

आधी बंद, दुपारनंतर भरला आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:01 IST

सकाळच्या सुमारास किरकोळ व ठोक भाजी विक्रेत्यांनी भाजीपाल्यांची खरेदी विक्री केली. शेतकरीही साहित्य घेवून बाजारपेठेत दाखल झाले होते. सकाळी ११ ते २ या कालावधीत किरकोळ दुकानदारांना या आदेशाबाबत माहिती मिळाल्यानंतर भाजीपाला पोत्यात भरून ठेवले होेते. दरम्यान पोत्यात बंद असलेला भाजीपाला खराब होवून नुकसानीबाबत चिंता सतावणाऱ्या भाजीविक्रेत्यांनी दुपारनंतर दुकाने सुरू केली.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रभाव टाळण्यासाठी उपाययोजना : जिल्ह्यात अन्य ठिकाणीही तशीच स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होत असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात आठवडी बाजार भरू नये यासाठी ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र तुमसरात सकाळी ११ ते दुपारी २ वाजतापर्र्यंत भाजी दुकाने बंद होती, परंतु त्यानंतर नियमितरित्या आठवडी बाजार भरला. आदेशानंतरही आठवडी बाजार भरल्याने चर्चा रंगली होती. मात्र ज्या भाजी विक्रेत्यांना या निर्णयाबाबत माहिती नाही, त्याबाबत कारवाई करावी काय, असा प्रश्नही निर्माण झाला. जिल्हाभरात अनेक ठिकाणी मंगळवारी बाजार भरत असतो. तुमसरातही मंगळवारी बाजार भरतो. परंतु दुपारनंतर या आदेशाला हरताळ फासल्या गेल्याचे दिसून आले.सकाळच्या सुमारास किरकोळ व ठोक भाजी विक्रेत्यांनी भाजीपाल्यांची खरेदी विक्री केली. शेतकरीही साहित्य घेवून बाजारपेठेत दाखल झाले होते. सकाळी ११ ते २ या कालावधीत किरकोळ दुकानदारांना या आदेशाबाबत माहिती मिळाल्यानंतर भाजीपाला पोत्यात भरून ठेवले होेते. दरम्यान पोत्यात बंद असलेला भाजीपाला खराब होवून नुकसानीबाबत चिंता सतावणाऱ्या भाजीविक्रेत्यांनी दुपारनंतर दुकाने सुरू केली. पोलीस प्रशासनाने भाजी विक्रेत्यांना दुकाने बंद करण्याकरिता बाजारात फिरून आवाहन केले होते. परंतु प्रशासनाने किमान दोन दिवसांपुर्वीतरी सूचना का दिली नाही, असे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे होते. बाजारपेठेत आलेल्या भाज्या बेवारस फेकून द्यायच्या काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला. देव्हाडी मार्गावरही भाजी विक्रेत्यांची दुकाने सुरू होती. आजचा दिवस वगळता पुढच्या आठवड्यापासून आठवडी बाजार बंद राहील, अशी चर्चाच सायंकाळच्या सुमारास बाजारात ऐकावयास मिळाली.कोरोनावर उपायांसाठी पालांदूर पोलीस ठाणे सरसावलेपालांदूर : संपूर्ण जगाला हादरवून सोडणाºया कोरोना विषाणूजन्य आजाराची सरळतेने माहिती सर्वसामान्यांना व्हावी, अफवांवर विश्वास न ठेवता सर्वसामान्यांना आरोग्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवावी, प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत आपल्या कर्तव्यात प्रामाणिकता ठेवावी, या हेतूने पालांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अंबादास तुंगार यांनी बैठकीचे आयोजन करून पोलीस पाटलांना विषाणूजन्य कॉरोना विषयात प्रबोधन केले. गरज नसताना घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, प्रसंगानुरुप जाणे झाल्यास खिशात रुमाल असावे शिंक किंवा खोकला आल्यास तोंडा नाकासमोर रुमाल घ्यावी, दिवसातून चार-पाच वेळा साबणाने स्वच्छ हात धुवावे, बाहेरून घरी आल्यास प्रथमता पाण्याने हातपाय स्वच्छ धुऊन नंतरच घरात प्रवेश करावा, समाजामध्ये चुकीचे विषय कोरोना अनुषंगाने पसरले जातात याकडे लक्ष देऊन जे आरोग्य विभागाने सुचवलेल्या सूचना आहेत त्यांची दक्षता प्रत्येकाने घ्यावी, असे अंबादास सूनगार यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिली. बाहेरगावावरून आलेली एखादी व्यक्ती आपणास कुरुंदा बाधित किंवा तत्सम लक्षणे आढळल्यास संबंधित आरोग्य विभागाकडे समस्य ठेवावी कुणालाही न घाबरवता सहकार्याच्या भावनेने मदत करावी, असेही यावेळी सांगण्यात आले.शहापुरात जागा बदललीशहापूर : जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर स्थानिक आठवडी बाजार मुळ जागेवर न भरता स्थानांतरीत झाला. प्रशासनानेच सकाळपासूनच भाजी विक्रेत्यांना नेहमीच्या जागेवर बसण्यास मज्जाव केला. सायंकाळनंतर आठवडी बाजार भंडारा-नागपूर मार्गावरील सर्व्हिस रस्त्याच्या नांदोरा मार्गावर भरला.लाखनीच्या आठवडी बाजारात गर्दीलाखनी : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे १६ मार्चला पत्रान्वये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत नगरपंचायत क्षेत्रात भरणाºया आठवडी बाजारात बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार लाखनी येथील मंगळवारी भरणाºया आठवडी बाजार बंद करण्याचा प्रयत्न नगरपंचायत प्रशासनाने केला. परंतु व्यापारी व किरकोळ विक्रेत्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने आठवडी बाजारात संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.सोमवारी रात्री मोठ्या बाजारपेठेतून लाखनीच्या बाजारात शेतमाल आलेला होता. तसेच आज पहाटेपासून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा माल भाजी बाजारात आलेला होता. किरकोळ विक्रेत्यांचा माल भाजीबाजारात आलेला होता. किरकोळ विक्रेत्यांनी सकाळी ८ ते १० पर्यंत खरेदी करून सकाळी ११ वाजेपासून भाजीपाल्याची दुकाने बाजारात लागलेली होती. लाखनीच्या आठवडी बाजारात १०० पेक्षा जास्त गावचे लोक भाजीपाला व इतर वस्तु खरेदीसाठी येत असतात. मंगळवारचा आठवडी बाजार हा ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते यांच्यासाठी महत्वपूर्ण असतो. कोट्यावधी रूपयाची उलाढाल होत असते. नगरपंचायत व बाजार समितीला यापासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार