संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हवाला व्यवसायावर करडी नजर ठेवली आहे. तसेच ठिकठिकाणी तपासणी नाके सुरु करण्यात आले असून या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. साकोलीसह जिल्ह्यात अद्यापपर्यंत कुठेही रोकड पकडण्यात आली नाही. मात्र पोलीस डोळ्यात तेल घालून निवडणूक काळातील गैरप्रकारावर लक्ष ठेवून आहेत. शांततेत निवडणूक व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.४विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला ७ ऑक्टोबर नंतर खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने उमेदवाराच्या खर्चाबाबत स्वतंत्र बँक खाते उघडणे बंधनकारक केले आहे. निवडणूक खर्चावर मर्यादा लादल्याने अनावश्यक खर्चाला कात्री लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून निवडणूक काळात काळ्या पैशाचा वापर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत असे प्रकार झाले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार नवनवीन फंडे उपयोगात आणतात. या काळात मतदारांच्या आवडीनिवडी जोपासण्यासोबतच अनावश्यक गरजाही पूर्ण केली जाते. त्यावर मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी होते. या पैशावर निवडणूक यंत्रणेची करडी नजर असते. उमेदवाराने किती खर्च केला याची इत्यंभूत माहिती मिळविण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे निवडणुकीच्या काळात उमेदवाराकडे गैरमार्गाने येणारा हवालाचा पैसा येण्याची शक्यता असते. या प्रकारावर जिल्हा पोलीस दल आणि निवडणूक विभाग डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत. भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्र आहेत. अद्यापपर्यंत प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली नाही. मात्र साकोली मतदार संघात तिहेरी लढत होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पैशाची वारेमाप उधळपट्टी होणार आहे. हा पैसा कुठून येणार हे जाणून घेण्यासाठी आतापासूनच पोलिसांच्या गोपनीय यंत्रणेने हवाला व्यवसायावर लक्ष ठेवले आहे. कुरिअर व्यवसायावरही त्यांची करडी नजर राहणार आहे. हवाला व्यवसायाशी संबंधित व्यक्तीचे मोबाईल टॅप करण्याची शक्यता आहे. काही हवाला व्यवसायीकांचे छुप्या मार्गाने मोबाईल क्रमांक पोलिसांनी गोळा केले आहे. विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता लागू झाल्यानंतर हवाला आणि काही मोजक्या लोकांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आणि राष्ट्रीय महामार्गावर पोलीस चेकपोस्ट सुरु करून वाहनांची तपासणी केली जात आहे. अद्यापपर्यंत रोकड जप्त झाली नाही. परंतु पोलीस दक्ष आहेत.
हवालावर पोलिसांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST
विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हवाला व्यवसायावर करडी नजर ठेवली आहे. तसेच ठिकठिकाणी तपासणी नाके सुरु करण्यात आले असून या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. साकोलीसह जिल्ह्यात अद्यापपर्यंत कुठेही रोकड पकडण्यात आली नाही. मात्र पोलीस डोळ्यात तेल घालून निवडणूक काळातील गैरप्रकारावर लक्ष ठेवून आहेत. शांततेत निवडणूक व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.
हवालावर पोलिसांची करडी नजर
ठळक मुद्देठिकठिकाणी तपासणी : जिल्ह्यात रोकड जप्त करण्याची अद्याप एकही कारवाई नाही