शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरी-शिंगोरी रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:37 IST

तालुक्यातील चांदोरी-शिंगोरी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देनाल्यावर पुलाची मागणी : विद्यार्थ्यांसह अनेकांना होतो त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील चांदोरी-शिंगोरी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.गत पाच दिवसांपासून भंडारा तालुक्यात संततधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे शिंगोरी-चांदोरी दरम्यान असलेल्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. या मार्गावरुन दवडीपार, पचखेडी, चांदोरी, शिंगोरी येथील नागरिकांना आवागमन करण्यास अडचणीचे ठरत आहे. चांदोरी येथील नागरिकांना भंडारा येथे जाण्यासाठी एकमेव मार्ग चांदोरी-शिंगोरी मार्ग आहे. भंडारा, लाखनी, दवडीपार, तिरोडा असे मार्ग येथून जात असून गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. यासंबंधी चांदोरी-शिंगोरी रस्त्यावरील नाल्यावर पुल बांधकामाची मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांनी केली होती. मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. दरवर्षी या पुलावर अनेक जण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतरही या मार्गावर पुल बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत तर नाही ना, असा सवाल चांदोरी परिसरातील नागरिकांनी केला आहे.या मार्गावरून अनेक लोकप्रतिनिधी ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते प्रशासन व लोकप्रतिनिधींशी नेहमीच नाल्यावर पुल बांधकामाची मागणी करीत असतात. मात्र त्यांच्या मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. चांदोरी, पचखेडी, दवडीपार येथील बहुतांश विद्यार्थी भंडारा, लाखनी येथे शिक्षणासाठी जात असतात. नाल्यावर पाणी वाहत असल्याने त्यांना शाळेत जाता येत नाही. पुलावर पाणी असल्याने तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना पोहचता येत नाही. परिणामी आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकार व राज्य शासन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे सांगत असले तरी याला चांदोरी नजीकचा नाला अपवाद ठरत आहे.अनेक वर्षांपासून पुलाची मागणी धूळखातलाखनी, भंडारा मार्गावर असलेल्या शिंगोरी फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या चांदोरी गावानजीक एक मोठा नाला आहे. दरवर्षी या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. दमदार पावसाची हजेरी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी नाल्याद्वारे वैनगंगा नदीला पोहचते. या नाल्यावर दरवर्षी बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. जीवीतहानीसह प्राणहानी होत असली तरी पुल बांधकामासाठी कुणीच पुढाकार घेत नसल्याने पुल बांधकाम अनेक वर्षांपासून रखडले आहे. भंडारा तालुका काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष मंगेश हुमणे यांनी उन्हाळ्यात पुल बांधकामाची मागणी प्रशासनाकडे केली होती. असे असतानाही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनावरचा विश्वास उडाल्याचा संताप परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन आता तरी पुल बांधकामासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.