शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारात स्वच्छतेचे धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:04 IST

शहराच्या मध्यभागी आठवड्यातून दोन दिवस भरत असलेल्या आठवडी बाजारातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजी व्यावसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत.

ठळक मुद्देउपेक्षा कायम : वर्षाकाठी मिळतोय लक्षावधींचा महसूल

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या मध्यभागी आठवड्यातून दोन दिवस भरत असलेल्या आठवडी बाजारातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजी व्यावसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत. उघड्यावर फेकलेला सडलेला भाजीपाला, ओट्यांची दुरवस्था, अतिक्रमण हीच खरी या बाजाराची ओळख ठरली आहे. प्रशासन मात्र प्रस्तावाच्या मंजुरीवर लक्ष केंद्रित करून आहे.जिल्ह्याचीे लोकसंख्या १५ लाखांच्या वर पोहोचली आहे. यात भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा जास्त आहे. दर आठवड्यातून दोन वेळा आठवडी बाजार भरतो. रविवारी मोठा तर बुधवारी मिनी बाजार भरतो. रविवारपेक्षा बुधवारी भाजी विक्रेत्यांची संख्या कमी असते. या बाजारारत टाकळी, पांढराबोडी, गणेशपूर, कारधा, भिलेवाडा, पलाडी, करचखेडा, सुरेवाडा, माडगी, सातोना, मोहदुरा, खोकरला, टेकपार, भोजापूर आदी गावातील लहान-मोठे भाजीविक्रेते येत असतात. लोकसंख्येच्या मानाने शहराच्या विविध ठिकाणीही बाजार भरतो. यात महात्मा गांधी चौक, बीटीबी मार्केट मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक मार्ग, खात रोड मार्ग आदी ठिकाणचा समावेश आहे. प्रविवारी व बुधवारी भरणाऱ्या बाजाराची शान आजही कमी झालेली नाही. मात्र सुविधांअभावी या बाजाराला अजुनही उठाव आलेला नाही.हजारो नागरिक येथे बाजारासाठी येत असले तरी विकासाअभावी त्यांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेचे स्वच्छता कर्मचारी अहोरात्र राबतात, पण अस्वच्छता करणाऱ्यांची कमी नाही. याला सर्वस्वी जबाबदार नगर पालिक प्रशासन आहे, असेही म्हणता येणार नाही. याला नागरिकांसह भाजीविक्रेत्यांची समाजाप्रती असलेली जबाबदारीही तेवढीच महत्वाची आहे. योजनेची अंमलबजावणी केव्हा होणार? हाच खरा प्रश्न आहे. दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समिती व पालिका प्रशासन यामध्ये बाजार ओटा संदर्भात न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. परिणामी बाजार विकासासाठी निर्णय होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.अशा आहेत प्रमुख समस्याआठवडी बाजार ओसरल्यानंतर सडलेला भाजीपाला साहित्य तिथेच फेकून दिला जातो. कर देतोय तर सुविधा का मिळत नाही, असा थेट सवाल भाजीविक्रेत्यांचा आहे. आठवडी बाजाराचा कंत्राट कुणालाही असो मात्र लिलावातून मिळणारी रक्कम थेथ पालिका प्रशासनालाच मिळते. सडक्या भाजीपाल्यांवर यथेच्छ ताव मारणारे मोकाट जनावरे, अतिक्रमण निर्मूलनानंतर वाईट स्थितीत आलेले बाजारओटे, २४ तास येणारी दुर्गंधी, पाण्याची टंचाई, नाल्यांचे सदोष बांधकाम, साचलेला कचरा या बाजाराच्या प्रमुख समस्या आहेत.बाजाराच्या विकासासंदर्भात पालिका प्रयत्नशिल आहे. सर्वप्रथम मटण बाजारासाठी जवळपास ५० लक्ष रूपयांचा प्रस्ताव सादर केलेला आहे.-नितीन धकाते, सभापती,स्वच्छता समिती, नगर परिषद भंडारा