पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला परिसर स्वच्छ : वंदना वंजारी यांचे आवाहनभंडारा : गावस्तरावर स्वच्छतेची चळवळ निर्माण करायची असेल तर त्यासाठी स्वत:पासून सुरूवात व्हायला हवी. अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वप्रथम स्वत:च्या कार्यालयाची स्वच्छता करून त्यामध्ये शाश्वतता ठेवावी त्यानंतर वैयक्तिकरित्या सुरूवात झालेल्या स्वच्छतेला गावस्तरावर पोहचविण्यासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा. व केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशनला लोकसहभागाचे बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वंदना वंजारी यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक शौचालय दिनी बोलत होत्या.यावेळी मंचावर महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा भुसारी, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप ताले, अर्थ व आरोग्य समिती सभापती संजय गाढवे, जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, जिल्हा परिषद सदस्य उके, जिल्हा परिषद सदस्य समरीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सुधाकर आडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण राठोड, कार्यकारी अभियंता सतीश सुशीर व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.वंदना वंजारी म्हणाल्या, स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी गावस्तरावर होण्याकरिता प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी व मिशनला लोकसहभागाचे स्वरूप देवून स्वच्छ गाव सुंदर गाव निर्माण करावे. नागरिकांच्या जीवनमानात बदल घडवून आणणाऱ्या या मिशनची अंमलबजावणी कागदावर राहू नये याकरीता लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन करीत जि.प. मध्ये आठवड्याला दर मंगळवारी कार्यालयाच्या स्वच्छतेविषयी पदाधिकारी पहाणी करणार व दोन तास कार्यालय व परिसराची स्वच्छता करणार असल्याची यावेळी घोषणा केली.कार्यक्रमानंतर जि.प. परिसराची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेतला. जि.प. अध्यक्षा वंदना वंजारी, सभापती रेखा भुसारी, संदीप ताले, संजय गाढवे, महेंद्र शेंडे, समरीत, आडे, राठोड यांनी जिल्हा परिषदेच्या परिसरात हातात झाडू घेवून स्वच्छता करण्यात आली.पदाधिकारी व अधिकारी यांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्याने कर्मचारी मागे राहिले नाहीत, त्यांनीही परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. (नगर प्रतिनिधी)
स्वच्छता मिशनला लोकसहभागाची गरज
By admin | Updated: November 22, 2014 22:57 IST