शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
2
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
3
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
4
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
5
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
6
Makar Sankrant 2026: संक्रांत साजरी करता, पण आदला आणि नंतरचा दिवस का महत्त्वाचा माहितीय?
7
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
8
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
9
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
10
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
11
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
13
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
14
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
15
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
16
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
17
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
18
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
19
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
20
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयासह तुमसर व पवनी येथे सिटीस्कॅन युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी खासदार पटेल बोलत होते. बैठकीला आमदार राजू कारेमोरे, माजी ...

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी खासदार पटेल बोलत होते. बैठकीला आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव उपस्थित होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सिटीस्कॅनचा मुद्दा ऐरणीवर आला होता. गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयातून सिटीस्कॅन करावी लागत होती. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत होता. आता लवकरच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिरिक्त सिटीस्कॅन युनिटसह तुमसर आणि पवनी येथेही सिटीस्कॅन युनिट सुरू करण्यात येणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून दोन युनिट आणि जिल्हा नियोजन समितीतून एक युनिट उभारले जाणार असल्याची माहिती खासदार प्रफुल पटेल यांनी दिली. ऑक्सिजन बेडची उपलब्धतता, ऑक्सिजनची उपलब्धतता यासह विविध रुग्णालयांतील खाटांची क्षमता, आदींची माहिती खासदार पटेल यांनी घेतली. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने काय तयारी केली याची माहिती खासदार पटेल यांनी घेतली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. पीयूष जक्कल यांनी टीबी वॉर्डात लहान मुलांसाठी ५० बेडचे कोविड केअर युनिट उभारले जाणार आहे. त्याठिकाणी बालकांना राहण्यासाठीही सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आल्याची माहितीही दिली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, धनंजय दलाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. माधुरी माथूरकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

बॉक्स

अदानी प्रकल्पाकडून मिळालेले ५० ऑक्सिजन सिलिंडर्सचे लोकार्पण

सीएसआर अदानी फाउंडेशनकडुन मिळालेल्या ५० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर्सचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. अदानी समूहाने कोरोना संकटात जिल्ह्याला मोठी मदत दिली. या ५० ऑक्सिजन सिलिंडरसोबतच आवश्यकतेनुसार आणखी १०० सिलिंडर भंडारा जिल्ह्याला दिले जाणार आहेत. तसेच १३ केएल क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार असल्याचे खासदार पटेल यांनी सांगितले. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सीएसआर अदानी फाउंडेशनचे नितीन शिराळकर, अदानी समूहाचे उपमहाव्यवस्थापक प्रवीण जयस्वाल उपस्थित होते.

बॉक्स

रब्बी धान खरेदी तत्काळ सुरू करा

जिल्ह्यात अद्यापही रब्बी हंगामातील धान खरेदीला प्रारंभ झाला नाही. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होईल. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदी तत्काळ सुरू करण्याचे निर्देश खासदार पटेल यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम यांना दिले. जिल्ह्यातील धान भरडाईचा प्रश्न निकाली निघाला असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कोरोना संसर्ग रोखण्याबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यात ३५० ऑक्सिजन बेड असून, ते ९०० पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.