शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत

By admin | Updated: July 20, 2015 00:25 IST

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा याकरिता तुमसर नगरपालिकेने ठोस पाऊले उचलत ईदच्या पावन ..

प्रथम चरणात : ४० मुख्य चौकात कॅमरे सुरुतुमसर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा याकरिता तुमसर नगरपालिकेने ठोस पाऊले उचलत ईदच्या पावन पर्वावर शहरातील ४० मुख्य चौकात सीसीटीव्ही लावण्याच्या कार्याला शुभारंभ करण्यात आल्याने शहरात मजनुगिरी करणारे महिलेची छेडछाड करणारे चोऱ्या, दरोडा, घातपात करणाऱ्याची आता खैर नाही.कार्यक्रमाचे उद्घाटन सराफा असो. चे अध्यक्ष डॉ. गौरीशंकर कारेमोरे यांच्या हस्ते तर पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश बुरडे, माजी नगराध्यक्ष जगदिश कारेमोरे, पोलीस निरीक्षक किशोर गवई, विद्यमान नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, उपाध्यक्षा सरोज भुरे, तरुण सोनी तसेच सर्व नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरली असतांनाच सर्वसामान्य नागरिकही दशहती खाली आल्याने कुठेतरी गुन्हेगारीवर आळा घालता यावा याकरिता सर्व नगरसेवकासह नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे हे प्रयत्नशिल असतांना जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती.पंरतू डीपीडीसी चा नियोजन झाल्यामुळे आर्थिक मदत मिळू शकली नाही. दरम्यान न खचता शहरातील सर्व सामाजिक संघटनांना एकत्र आणून त्यांच्या थोड्याफार मदतीच्या आधारावर शहरात दोन चरणात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्याची प्रक्रिया होणार असून प्रथम चरणात शहरातील ४० मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कार्याला सुरुवात झाली असून त्या कॅमेराची रेकॉर्डिंग डी.व्ही.आर मध्ये होणार आहे. तर दुसऱ्या चरणाचे काम लवकरात लवकर सुरु करुन शहरातील प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रावधान आहे. नगरपरिषद तसेच पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र मॉनिटर उघडण्यात आले आहे. प्रत्येक घटनांवर नजर ठेवणे सहज शक्य होणार असून सराफा असो. लायन्स क्ल्ब, जे.सी.आय. सारख्या मोठ्या संघटनेनी नगरपरिषदला आर्थिक सहकार्य करुन शहराची शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरिता मदत करण्याचे आव्हान नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)