शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

निर्माणाधीन रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

कारधा ते निलज या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदरचे बांधकाम होताना यापूर्वीच अनधिकृतपणे महामार्ग बांधकामाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेलगतच्या हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली. एकीकडे शासनाकडून पर्यावरणपूरक योजनांची प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. संथगती महामार्ग बांधकामामुळे अनेक जण अपघाताला तर गावकरी नागरिक धुळीमुळे प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : भंडारा ते पवनी राज्यमार्गाचे काम संथगतीने

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : कारधा ते निलज महामार्गाचे बांधकाम गत काही महिन्यापासून सुरू आहे. या निर्माणाधीन रस्त्यावरील धुळीचा फटका नागरिकांना बसत असून अपघातातही वाढ झाली आहे.महामार्गाचे बांधकाम अत्यंत संथगतीने होत असून एकेरी वाहतुकीचा फटका अनेक वाहनांना बसत आहे. त्यांना अपघाताला सामोरे जावे लागते. रस्त्यावरील धुळीमुळे हजारो नागरिकांना प्रदूषणाचा फटका बसत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पर्यावरण, प्रदूषण व आरोग्य नियंत्रण समिती कार्यकर्त्यांनी वैनगंगा पूल ते बेटाळा गावापर्यंत तात्पुरती रस्ता दुरुस्ती करण्याचे निवेदन पवनी तहसीलदारांना देण्यात आले.कारधा ते निलज या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदरचे बांधकाम होताना यापूर्वीच अनधिकृतपणे महामार्ग बांधकामाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेलगतच्या हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली. एकीकडे शासनाकडून पर्यावरणपूरक योजनांची प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. संथगती महामार्ग बांधकामामुळे अनेक जण अपघाताला तर गावकरी नागरिक धुळीमुळे प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्ता तयार करण्यासाठी सुरक्षेचे कोणतेही उपाय केले नाही. एका बाजुला रस्ता तयार होत असताना दुसऱ्या बाजूला मोठाले खड्डे पडले आहेत. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून यावरुन शेकडो वाहने धावतात. मात्र वाहन चालकांना कायम अपघाताची भीत असते. डोळ्यात धूळ उडत असल्याने समोरचे दिसतही नाही. दूचाकी चालकांना तर या रस्त्यावरुन जाणे म्हणजे तारेवरची कसरत असते. रस्त्याच्या जलद गतीने कामासाठी मनोहर मेश्राम, शंकर तेलमासरे, अवनती राऊत, अरविंद धारगावे, सय्यद ताजुद्दीन, प्रकाश भोंगे, महादेव शिवरकर, रमेश मोटघरे, राजू गणवीर, अनिल मेश्राम, आनंदविलास रामटेके, जगन्नाथ मुंडले, प्यारू तलमले, नत्थु हटवार, संतोष लांजेवार यांनी पवनीच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.अपघात वाढलेनिर्मानाधीन रस्त्यामुळे अपघातातही वाढ झाली आहे. गत आठवड्यात ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मालवाहू वाहनाचा अपघात होऊन दोन जण ठार झाले होते. दुचाकी अपघातातही वाढ झाली आहे. वाहन चालकांना येथे मोठी कसरत करावी लागते.