शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

भंडाऱ्यातील नागरिकांना होतोय लोड शेडींगचा त्रास; ब्रेक डाऊनच्या नावाखाली भारनियमन केले जाते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:04 IST

उन्हाळ्यात जीव उकळून निघणार ? : शहरांसह ग्रामीण भागात विजेच्या मागणीत होतेय वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उन्हाचा तडाखा वाढला तसे वीजमीटर पळू लागले आहे. वाढत्या वीजवापरामुळे शहरांसह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत असून, घामाघूम होत आहेत.

पूर्वी हिवाळ्यात शेतीसाठी विजेच्या मागणीत वाढ होत असल्यामुळे तीन ते चार महिने वीजटंचाई निर्माण होत असे. अलीकडच्या काळात मात्र बाराही महिने वीजसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. सध्या शेतीसाठी केवळ आठ तास वीजपुरवठा करण्यात येतो. तोही सुरळीत होत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड होत आहे. शहरी भागातही वीज समस्येला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. किमान या दिवसांत तरी महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी वीजग्राहकांतून होत आहे. वीजबिलापोटी थकबाकीचा डोंगरही वाढत असून वसुलीस अडचणी येत आहे. 

दिवसरात्र राहतात फॅन, एसी, कूलर फूल स्पीडवर !फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच प्रखर ऊन आणि वातावरणात उकाडा जाणवत आहे. त्यामुळे फॅन, एसीचा वापर वाढला असून, वीजमीटर पळू लागले आहे. अडगळीत पडलेले कूलरही आता दुरुस्तीसाठी काढण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

ब्रेक डाऊनच्या नावाखाली भारनियमन केले जाते का?सध्या शहरात भारनियमन करण्यात येत नसले, तरी ग्रामीण भागात मात्र ब्रेकडाऊनच्या नावाखाली भारनियमन सुरू आहे. शेतीसाठी तर केवळ आठ तास वीजपुरवठा करण्यात येतो. अशा परिस्थितीत पिकांना पाणी कसे द्यावे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

तर तेथे जास्त भारनियमनविजेच्या मागणीत वाढ होत आहे, तर दुसरीकडे वीजगळतीही वाढत आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत करणे महावितरणपुढे आव्हान ठरत आहे. त्यातच वीजचोरीचे प्रकारही सुरू असल्याने डोकेदुखी वाढली आहे

आता ही स्थिती तर पुढे काय?उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वीज समस्या गंभीर बनत चालली आहे. येणाऱ्या दिवसांत तर विजेच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना वीज समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

वाढते ऊन अन् वीजदर फोडतोय ग्राहकांचा घाममहिनाभरापासून प्रखर ऊन आणि वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशा वातावरणाचा आबालवृद्धांना त्रास होत आहे. नागरिकांना फॅन, एसी, कूलरशिवाय घरात बसणेही शक्य होत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

८ तास कृषीपंपांना होतोय वीज पुरवठामार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा सुरु झाला आहे. त्यामुळे विजेवर आधारित उपकरणांचा वापर वाढला आहे. वीज पुरवठा खंडितने समस्या वाढली आहे. 

टॅग्स :electricityवीजbhandara-acभंडारा