वरठी : अस्वच्छतेचे माहेरघर असलेल्या भंडारा रोड रेल्वे स्थानकावर शेकडो हातानी हातात झाडु घेऊन स्वच्छता मोहीम राबवली. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक अधिकारी, कर्मचारी, सल्लागार समिती सदस्य, आॅटो रिक्शाचालक, प्रवाशी यांच्यासह स्थानिक नवप्रभात हायस्कूलचे विद्यार्थी, प्राचार्य व प्राध्यापक यांनी रेल्वे स्टेशन परिसर व रेल्वे वसाहतीतील कचरा व घाण नष्ट करण्यासाठी तीन तास श्रमदान केले. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात होणारी स्वच्छता अभियान पाहुन अनेक जण मोठ्या उत्साहात यात सहभाग घेताना दिसले.रेल्वे स्थानक म्हणजे प्रवाशाची गर्दी आणि गर्दीत घाण व कचरा मोठ्या प्रमाणात होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता मोहिम अभियान भंडारा रोड रेल्वे स्थानकावर उत्साहात राबविण्यात आले. भंडारा रोड रेल्वे स्टेशन व स्वच्छता अभियानाची सुरूवात उपस्थित सर्वांना स्वच्छता शपथ देवून करण्यात आली. त्यानंतर रेल्वेचे अधिकारी रविनंद क्युलीयार, तन्मय मुखोपाध्याय, सेवक कारेमोरे, रमेश सुमारे यांच्यासह उपस्थित सर्वांनी हातात झाडु घेवून स्वच्छता अभियानाला सुरूवात केली. एकाचवेळी 'हाय फाय प्रोफाईल' अधिकारी व गावातील प्रतिष्ठांच्या हातातील झाडु पाहुण अनेकांनी उत्साहात या अभियानात उडी घेवून कचरा व घाण स्वच्छता करण्यास सुरूवात केली. तीन तास चाललेल्या या अभियानात जवळपास दोन कि़मी. अंतराचे परिसर पिंजून काढण्यात आले.स्वच्छ भारत, सुंदर भारत या संकल्पनेला प्रत्यक्षात स्वत:पासून सुरुवात करण्यासाठी नवप्रभात हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शेकडो मुले मुली सरसावल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वच्छता मोहीम सुरु होणार आहे. स्वच्छ भारत सुंदर भारत या घोषणेला वरठी येथून प्रचंड प्रतिसाद मिळाला. शालेय वेळेत घरून सजून व स्वच्छ कपड्यात ही योजना राबवायची योजना मुलांना आवडली नसल्याचे लक्षात आले. वेळेवर पूर्व सूचना न देता काम करवून घेण्यासाठी प्राध्यापकांनी स्वच्छतेचे महत्व व या साफ सफाई अभियानातील आपले लहानसे प्रयत्न प्रत्येक गावात झाल्यास भारतात अस्वच्छता राहणार नाही असे समजावून सांगितले. प्राध्यापकांच्या सूचनेवरून सर्व विद्यार्थी एका पायावर तयार झाले. एका मागोमाग एक असे ३०० च्या वर विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग घेतला. ङ्क्तयात मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात होती.सर्वप्रथम स्वच्छतेचे नारे लावत गावातून रॅली काढण्यात आली. त्यानंतर रेल्वे स्टेशनला लागून असलेले रेल्वे कर्मचारी वसाहतीतील केरकचरा साफ करून अनेक विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने कोणतेही साधन नसताना या भागात वाढलेले गवत व निरुपयोगी झाडे उपटली. साफ सफाई योजनेअंतर्गत जमा झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक व रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा उत्साह पाण्याजोगा होता.साफ सफाई अभियानात कधीही हातात फावडा अथवा विळा न पकडलेल्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना काम करताना पाहून अनेकांना मजा येत होती. तर ज्यांच्या एकट्याकडून झाडे उपडण्यात यश आले नाही, त्यांच्याकडून त्यांच्या सहकारी मित्रांना बोलावल्यावर युवकांचे घटत जाणारी संख्या एकतेचे व मदतीचे संकेत देत होते. एकंदरीत देशातील ज्या युवकांच्या भरवशावर देशाचे प्राबल्य टिकून आहे ते जर असेच आयुष्यभर झटत राहिले, काम करत राहिले तर भारताचे नाव जगात नंबर एकवर येण्यास वेळ लागणार नाही असे जाणवत होते. रेल्वे स्टेशन व रेल्वे वसाहतीत मोठ्या प्रमाणात पडलेला कचरा प्रा. शशांक चोपकर व प्राचार्य अशोक गजभिये यांनी आगकाडी लावून पेटविले. स्वच्छता अभियानात रेल्वेचे मंडळ वाणिज्य व्यवस्थापक तन्मय मुखोपाध्याय यांचे स्वत: पुढाकार घेण्याचे तंत्र पाहुण त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारे होते. हातात मोजे घालून त्यांनी सफाई केलेला कचरा व घाण स्वत: उचलून कचरा पेटीत टाकला. या अभियानात जवळपास २०० च्यावर अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून स्वच्छतेचा संदेश पोहचविला.रेल्वे कर्मचारी वसाहतीत अनियमित साफसफाई मोठ्या प्रमाणात कचरा व गवताचे जंगल वाढले होते. ऐन कार्यक्रमाच्या दिवशी गोंधळ होईल म्हणून रेल्वे स्टेशन मास्टर कल्याण रामटेके यांनी स्थानिक कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या मदतीने तीन दिवसांपासून स्वच्छता कार्यक्रम सुरू केला. आज सकाळी नागपूर येथील वरिष्ठ वाणिज्य मंडळ प्रबंधक तन्मय मुखोपाध्याय व बिलासपूर झोनचे रविनंद क्युलीयर यांच्या उपस्थित भंडारा रोड रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबवण्यात आली. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी धनंजय कुमार, सरदारे, तुलकाने, सल्लागार समिती सदस्य सेवक कारेमोरे, रमेश सुपारे, स्टेशन मास्टर कल्याण रामटेके, प्रबंधक बी.एम. मुरमु, उपस्टेशन प्रबंधक बी.आर. मीणा, आर. एन. नागदेवे, विशाल देशमुख, के.एम. वैद्य, आर.के. वोहरा, अजयकुमार सिंह, प्राचार्य अशोक गजभिये, प्रा. शशांक चोपकर, आॅटोचालक शामराव साठवण,अरुण हीरेखण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
स्वच्छतेसाठी सरसावले प्रशासनासह नागरिक
By admin | Updated: October 3, 2014 01:13 IST