शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

भटक्यांची मुले शिकली पाहिजे!

By admin | Updated: January 30, 2017 01:47 IST

भटक्या समाजात अज्ञान आणि अज्ञानामुळे अंधश्रध्दा सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी भटक्यांची मुले

भिकुजी इदाते : भिलेवाडा येथे भटके -विमुक्त विकास परिषद, २,९०० भटक्या कुटुंबीयांची नोंद भंडारा : भटक्या समाजात अज्ञान आणि अज्ञानामुळे अंधश्रध्दा सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी भटक्यांची मुले शिकली पाहिजेत जगाचे ज्ञान शिक्षणाशिवाय कळणार नाही, असे मत भटके विमुक्त आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकुजी (दादा) इदाते यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय भटके-विमुक्त विकास परिषदेचे भिलेवाडा येथे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. बिऱ्हाड परिषदेचे अध्यक्ष उकांडा वडस्कर, उपाध्यक्ष शिवा कांबळी, संयोजक दिलीप चित्रीवेकर, प्रवीण जगताप, प्रकाश शेंडे, नत्थुजी बिसने, अंकोश तांदुळकर, वासुदेव सुतार बहुरुपी, व्यंकट ठाकरे वडार, शिवाजी गायकवाड कैकाळी, शामराव शिवणकर गोपाळ, राजू शेंडे होली, चैनसिंग कतारी, दीपक अंकुशे ओतारी, गोपीचंद शिवणकर पांगूळ, इंदल नारनवरे पारधी राजकुमार दोनोडे आदी उपस्थित होते. भिकु इदाते म्हणाले, भटक्या समाजासमोर शिक्षणाचा, आरोग्याचा, घरादाराचा, रोजगाराचा असे अनेक प्रश्न आहेत. भटके-विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते अनेक मोर्चे, आंदोलन करुन हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात, आता मात्र हे प्रश्न मोर्चे, आंदोलनाने सोडविण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर भर देवून सोडविण्यासाठी पालकांनी व कार्यकर्त्यांनीही पुढाकार घ्यावा. भटक्यांची मुले जोपर्यंत शिक्षण घेणार नाहीत तोपर्यंत त्यांना सरकारच्या योजना करळणार नाही. भटक्यांच्या संघर्षाचा लढा कायम सुरु राहिल. भटक्यांची सव्वाकोटी लोकसंख्या असूनही त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नाही. बार्टीच्या धरतीवर भटक्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचेही यावेळी इदाते यांनी सांगितले. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बिऱ्हाडासह महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, वाशिम, मेहकर, वर्धा या जिल्ह्यातील भटक्या समाजांची १४०० बिऱ्हाड भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावात मिळेल त्या साधनाने पोहचले होते. नागजोथी, बहुरुपी, ओतारी, कतारी, बेलदार, पांगूळ, वडाळ, गिरी, पारधी, गोपाळ, सोंजारी, मांगगारुडी, गोंधळी, मसनजोगी, कैकाळी, जोशी, होली, बैगागोंड आदी भटक्या समुदायातील लोक या परिषदेत सहभागी झाले होते. भटक्या विमुक्तांच्या जीवनात विकासरुपी सुर्याचा प्रकाश पोहचावा, त्यासाठी समाज, संघटना आणि शासन यांच्यात समन्वय साधला जावा या हेतुने परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून दोन दिवसीय बिऱ्हाड परिषदेचे उद्घाटन काल झाले. उद्घाटन आमदार परिणय फुके व प्रांत प्रचारक प्रसाद महानकर यांच्या हस्ते करण्यात आले. इदाते यांच्या हस्ते या बिऱ्हाड परिषदेचे समारोप करण्यात आले. याशिवाय शोभायात्रा, मुक्त चिंतन, गटचर्चा आणि समारोप कार्यक्रम पार पडला. रात्रीला भटकी लोककला सादर करण्यात आली. यामध्ये गोपाळाचा खेळ, बहूरुपींचे वेशभूषा, नागजोथींचे किंद्रीवादन, पांगुळाचे दानपावले, गरमगठ्टा आदी कलांचा समावेश होता. २०१० मध्ये कारधा येथे पहिली बिऱ्हाड परिषद झाली होती. २०१२ मध्ये चारभट्टी (लाखांदूर)तर तिसरी बिऱ्हाड परिषद २०१४ मध्ये साकोली येथे झाली होती. या दोन दिवसीय परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे ध्वजारोहण, भटक्या लोककलांचे प्रदर्शन, शासकीय योजनांची माहिती, शोभायात्रा, प्रदर्शनी, भटकी बाजार, रोगनिदान शिबिर, जातप्रमाणपत्र वाटप, शासकीय अधिकाऱ्यांसोबत संवाद असे या बिऱ्हाड परिषदेचे स्वरुप होते. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २,९०० भटके कुटूंबियांची नोंद घेण्यात आली आहे. याप्रसंगी भटक्या विमुक्तांच्या विविध समस्या व मागण्यांसंबधी चर्चा करण्यात आली. भटकी समाजाला जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, यशवंतराव चव्हाण भटकी वसाहत योजना सुरु करण्याबाबद, वनजमीन अतिक्रमण पट्टा वाटप करण्याबाबद, भटक्या जमातीतील महिलांना कुटीर उद्योग शासनातर्फे कर्ज देण्यात यावे अशा महत्वपूर्ण मागण्यांकडे शासनाचे लक्ष केंद्रीत करण्याचे आश्वासन देण्यात आले.