शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

परातेंच्या घुमजावात अडकले मुख्य कार्यकारी अधिकारी

By admin | Updated: June 18, 2016 00:20 IST

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातील सहा महिन्यापूर्वी कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी उपकार्यकारी अभियंता रामदास भगत यांची दोन प्रकरणात विभागीय चौकशी सुरू असून....

प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे : ‘त्या’ अभियंत्यांची कार्यालयीन चौकशी सुरुप्रशांत देसाई भंडाराजिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातील सहा महिन्यापूर्वी कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी उपकार्यकारी अभियंता रामदास भगत यांची दोन प्रकरणात विभागीय चौकशी सुरू असून त्यांच्याकडे कार्यभार सोपविणे योग्य नसल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्याच पराते यांनी दोन दिवसापूर्वी भगत यांच्याकडे कार्यभार सोपविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागातीेल कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी या गैरप्रकरावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘लोकमत’ वृत्त मालिकेमुळे कार्यकारी अभियंता व जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर प्रकरण अंगलट येईल, या भीतीने कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी वैद्यकीय रजा घेतली. एकीकडे कामे पूर्ण करण्यासाठी १५ दिवस शिल्लक असताना पराते हे रजेवर गेल्याने कामांचा खोळंबा होऊ नये, म्हणून त्यांनी अधिनस्थ उपकार्यकारी अभियंता रामदास भगत यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी आॅक्टोबर महिन्यात सीईओंना पत्र देऊन सदर विभागात बदल्या किंवा कार्यभार सोपविण्याची चर्चा करूनच कार्यवाही करावी, असे म्हटले असतानाही त्यांनाही विश्वासात घेण्यात आलेले नाही.भगत आता कार्यक्षम झाले कसे?कार्यकारी अभियंता पराते हे नोव्हेंबर महिन्यात वैद्यकीय रजेवर गेले होते. त्यावेळी पराते यांनी उपकार्यकारी अभियंता रामदास भगत यांच्या विरूद्ध दोन विभागीय चौकशी सुरू असल्यामुळे त्यांना विभागाचा कार्यभार सोपविणे योग्य नाही, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिले होते. असे पत्र देणारे पराते यांनी सहा महिन्यातच भगत यांच्याकडे कार्यकारी अभियंतापदाचा प्रभार सोपविला. त्यामुळे चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच भगत हे आता कसे कार्यक्षम झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.अमरावती, गडचिरोलीत अपहाराचा ठपकाभंडारा जिल्हा परिषदमध्ये बदली होण्यापूर्वी रामदास भगत हे अमरावती जिल्ह्यातील तिवसा उपविभागात कार्यरत होते. तेथून त्यांची बदली गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागात झाली. तिवसा व अहेरी येथील त्यांचा कार्यभार वादग्रस्त ठरला. या दोन्ही ठिकाणी त्यांनी अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर असल्याने दोन्ही प्रकरणाची मंत्रालयातून चौकशी लावली आहे. अधीक्षक अभियंता या दोन्ही प्रकरणाची चौकशी करीत आहेत, हे विशेष.