शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

चिखली बिटात सागवान झाडांची सर्रास कत्तल

By admin | Updated: June 10, 2014 23:52 IST

तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रांतर्गत चिखली बिटात मौल्यवान सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली. वनविभागाने थुटासह माल जप्त केला. जप्ती झाडांची किंमत केवळ ७० ते ८० हजार असल्याचे वनविभाग सांगत आहे.

तुमसर : तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रांतर्गत चिखली बिटात मौल्यवान सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली. वनविभागाने थुटासह माल जप्त केला. जप्ती झाडांची किंमत केवळ ७० ते ८० हजार असल्याचे वनविभाग सांगत आहे. सन १९६० पासून जंगलात एक हजार हेक्टर परिसरात मौल्यवान सागवान वृक्ष आहेत. या वृक्षांच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.भंडारा जिल्ह्यात सर्वात घनदाट जंगल म्हणून लेंडेझरी तथा नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राचा समावेश होतो. तुमसर ३५ कि.मी. अंतरावर लेंडेझरी वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्राच्या चिखली बिटात २४ व २५ मे रोजी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एका कंत्राटदाराच्या ठिय्यावरून सागवान वृक्ष जप्त केले. हे सागवान वृक्ष आदिवासींच्या शेतातून कापले असे जप्तीमध्ये नमूद केले आहे. थुटासहित हे सागवान वृक्ष चौकशीत आढळले. वनविभागाच्या नियमानुसार टीआर, खसरा क्रमांक, केस सेलींग आॅर्डर तयार करून माल जप्त करण्यात आला. त्या सागवान वृक्षांची किंमत ७० ते ८० हजार असल्याचे सांगण्यात येते.चिखली गावाशेजारी दोन कंत्राटदारांचे टॉल्स आहेत. या कंत्राटदारांकडे नियमानुसार लायसेन्स आहेत. नियमानुसार अधिकृत इतर वृक्षासहित त्यांचेकडे सागवान वृक्ष सुद्धा आहेत. पुष्पतोडे या कंत्राटदारावर वनविभागाने नियमानुसार कारवाई केली असे सांगण्यात आले. या प्रकरणात तक्रारीनंतर वनविभाग खडबडून जागे झाले. प्रकरण अंगलट येणार असे दिसताच नवनविभागाने कारवाई केल्याची माहिती आहे. सध्या सागवान जप्त करून वनविभागाने डेपोत पाठविले आहे. नागपूर जिल्ह्याच्या सीमा जवळ आहेत. एक चमू नागपूरवरून येथे आली होती. त्यानंतर कारवाईला गती आली अशी माहिती आहे. चमू कोणाची होती याबाबत गुप्तता पाळली जात असली तरी दबक्या आवाजात परिसरात चर्चा सुरु आहे. ती चमू परतल्यावर वनविभागाने कारवाई केली. चिखली बिटात कंपार्टमेंट क्रमांक ५९ व ६० मध्ये अनुक्रमे ५८१ व सुमारे ५०० हेक्टर मध्ये सागवानचे जंगल आहे. सन १९६० मध्ये सागवान रोपवन येथे तयार करण्यात आले होते. त्यानंतर सन १९७८, १९७९, १९९५ व १९९६ मध्ये येथे सागवन रोपवन तयार करण्यात आले. या रोपवनातील सागवानाची झाडे मोठी झाली असून त्यांची किंमत सध्या कोट्यवधींची आहे. या सागवन रोपवनातून आतापर्यंत वनविभागाने वृक्षतोड केली नाही हे विशेष. सुमारे एक हजार हेक्टर परिसरात पसरलेल्या सागवान वृक्षांच्या संरक्षणाकरिता केवळ दोन बिट कर्मचारी आहेत. त्यांचेकडे स्वत:च्या सुरक्षेकरिता शस्त्रे नाहीत. या घनदाट जंगलातील झाडे सुरक्षित असतील का? असा प्रश्न उपस्थित होतो. (तालुका प्रतिनिधी)