२५ एकरात भाजीपाला उत्पादन : शंभराहून अधिक मजुरांना दिला रोजगार रंजित चिंचखेडे चुल्हाडकेल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. या संत नामदेवाच्या अभंगातील ओळीतून एका तरूण शेतकरी पुत्राला स्फूर्ती मिळाली. शेती व्यवसायातून वर्षभर मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांचेसाठी तो मायबापच ठरला असल्याचा प्रत्यय रेंगेपार गावात निदर्शनास आला आहे. प्रगतशील शेतकऱ्याचे श्रेणीत नाव लौकीक करणाऱ्या युवा शेतकऱ्यांचे सुभाष हिरपा निशाने असे त्याचे नाव आहे.वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या रेंगेपार पांजरा गावात रोजगारांचा अभाव आहे. गावात सधन कुटूंब बोटावर मोजण्या इतपत आहे. बहुतांश कुटूंब रोजगारासाठी शहरात धाव घेत असल्याने मुलांचे शिक्षण प्रभावित होत आहे. गावात कामे असताना रोजगार निर्मिती दालने निर्माण होत नाही, अशी खंत गावातील मजुरांना आहे. या गावात एका शेतकरी पुत्राने मजुरांच्या स्थानांतरणाला ब्रेकअप दिला आहे. सुभाष हिरपा निशाने या युवा शेतकऱ्यांनी यशोगाथा प्रेरणादायी ठरणारी आहे. संत रामदेवाच्या अभंगातून घेतलेल्या ओडीतून प्रेरणा मिळाली असली तरी स्वत:चे व गावातील मजुरांना गावातच स्फूर्ती देणारी ठरली आहे. सुभाष या युवा शेतकऱ्याकडे वडिलोपार्जीत १० एकर शेती आहे. याशिवाय २५ एकर शेती त्यांनी ठेका पद्धतीने घेतली आहे.या शेतीत सुभाषने ऊस, वांगे, भेंडीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. स्वत:च स्वत:चा मार्गदर्शक असे चित्र या युवा शेतकऱ्याने निर्माण केले आहे. पारंपारिक पद्धतीच्या शेतीला तिलांजली व आधुनिक पद्धतीच्या शेतीकडे कल या सुत्राचा अवलंब करित सुभाषने ३२ पुरूष आणि १८ महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शेत शिवारात भाजीपाला उत्पादनाची लागवड झाली असता मजुरांच्या हाताला काम राहत नहाी. यामुळे त्यांचे कुटूंबावर उपासमारीची पाळी येत असल्याचे लक्षात येताच सुभाषने ऊस कापनीची टोळी तयार केली आहे. या टोळीला कापनीचे साहित्या स्व खर्चातून उपलब्ध करून दिले आहे. गावात ३०० एकर हुन अधिक शेत शिवारात ऊसाची लागवड करण्यात आली आहे. या ऊस कापनीच्या कामावर मजुर उपलब्ध करून देण्यास सुभाषने हातकंडा निर्माण केला आहे. ऊस कापनीचे कंत्राट आता मजुर स्वत:च घेत आहे. थेट फायदा या मजुरांना होत आहे.यामुळे या मजुरांच्या आयुष्यात गवाात नवचैतन्याची बाग फुलविली आहे. सध्या ४ एकर जागेत भेंडीची लागवड सुभाषने केली आहे. भेंडीची लागवड भरभराटीला आली आहे. भेंडीचे विक्रमी उत्पादन घेण्याची वाटचाल सुभाषने सुरू केली आहे. जेमतेम १० वी पर्यंत शिक्षण पुर्ण केलेल्या सुभाषच्या आयुष्यात १२ वी उत्तीर्ण पत्नीचे मार्गदर्शन व मदत यशाची गुरूकिल्ली ठरत आहे. शेती व्यवसायात फळबाग तथा भाजीपाला उत्पादनात औषधी फवारणी करताना स्वत:च कौशल्य व बुद्धीमतेचा केलेला उपयोग रामबाण ठरत आहे. कृषी केंद्रावरून खरेदी करण्यात आलेली औषधी थेट फवारणी न करता औषधी मधील गुणधर्माचा अन्याय तथा अन्य औषधांचे मिसरण याची जोड दिली जात असल्याने किट नाशकात अतिशय उपयोगाचे असल्याचे सुभाषचे म्हणणे आहे. जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी सेंद्रीय खतांचा आधार घेवून उत्पादनात वाढीसाठी उत्तुंग भरारी असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांचे शेत शिवारात उत्पादीत साहित्यांना बांधावरच मार्केटिंग मिळाली पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीचा भुर्दंड बसणार नाही. अधिका अधिक नफा शेतकऱ्यांना थेट प्राप्त होणार आहे. वैनगंगा नदी काठालगत शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. या शेतकऱ्याचे दारात थेट मार्केटिंग मिळाल्यास संजीवनी ठरणार असल्याची प्रतिक्रिया युवा शेतकरी सुभाष निशाने यांनी दिली आहे.
सुभाषने फुलविली मजुरांच्या आयुष्यात चैतन्याची बाग
By admin | Updated: February 20, 2016 01:29 IST