लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : नगर परिषद तुमसरने १५० वर्षाचा ऐतिहासिक कार्यकाळ पुर्ण केला. त्याचा सार्थ अभिमान बाळगून शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्ताने संपुर्ण आठवडा तुमसर महोत्सव साजरा करण्यात येत आहे. हा महोत्सव ऐतिहासिक महोत्सव होण्याकरिता न.प. प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. परिणामी न भुतो न भविष्यती असा या महोत्सवाचे स्वरुप असून महोत्सव ऐतिहासिक होणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रदिप पडोळे यांनी केले.नगर पालिका ढंगारे प्राथमिक शाळेच्या पटांगणात तुमसर सुणर्व महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.उद्घाटक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार गजेंद्र बालपांडे, उपाध्यक्षा कांचन कोडवानी, अनिल जिभकाटे, नगरसेवक प्रमोद घरडे, मेहताब ठाकूर, श्याम धुर्वे, सुनिल पारधी, सचिन बोपचे, राजा लांजेवार, किशोर भवसागर, पंकज बालपांडे, गिता कोडेवार, किरण जोशी, ताराबाई गभणे, अर्चना भुरे, नागेश धार्मिक, विक्रम लांजेवार, शोभा लांजेवार, अरविंद गभणे आदी मंचकावर उपस्थित होते.याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथ संचालन सांस्कृतिक नृत्य, क्रिडा व्यायामाचे प्रात्याक्षिके दाखवून आकर्षित केले. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र पडोळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी मानले.
शतकोत्तर सुवर्ण महोत्सव होणार ऐतिहासिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:34 IST
नगर परिषद तुमसरने १५० वर्षाचा ऐतिहासिक कार्यकाळ पुर्ण केला. त्याचा सार्थ अभिमान बाळगून शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्ताने संपुर्ण आठवडा तुमसर महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
शतकोत्तर सुवर्ण महोत्सव होणार ऐतिहासिक
ठळक मुद्देप्रदीप पडोळे : तुमसर महोत्सवाची सुरुवात