शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय महोत्सवात सखींचा जल्लोष

By admin | Updated: January 14, 2016 00:42 IST

‘सत्यम शिवम् सुंदरम्’, या गीताने आरंभ झालेल्या महोत्सवाने ‘मेरा पिया घर आया’, ‘मोरनी बागा ना बोले’, या गीताने रंगत आणली.

१७० स्पर्धकांचा सहभाग : एकल, युगल-समूह नृत्य, एकपात्री अभिनय, पथनाट्य स्पर्धाभंडारा : ‘सत्यम शिवम् सुंदरम्’, या गीताने आरंभ झालेल्या महोत्सवाने ‘मेरा पिया घर आया’, ‘मोरनी बागा ना बोले’, या गीताने रंगत आणली. ‘माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी’, या गीताने उपस्थितांचे लक्ष वेधले तर ‘अप्सरा आली...’, या गीताने अप्सरा अवतल्याचा भास झाला. ‘शांताबाई शांताबाई’ या धमाल गीताने तर सखींचे पाय थिरकारयला लागले. निमित्त होते लोकमत सखी मंचच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीत सखी महोत्सवाचे. स्थानिक सनीज स्प्रिंगडेल शाळेत सखी जल्लोष २०१५-१६ या जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन सनी कन्सट्रक्शनचे संचालक सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून नितीन धकाते, आशिष खराबे, प्रविण साठवणे, विलास शेंडे, डॉ. अमर गजभिये, प्रशांत केसलकर, शशिकांत भोयर, वर्षा गौपाले, डॉ. स्रेहा राऊत उपस्थित होते.पालांदूर येथील ज्योती पिंपळे यांनी ‘सत्यम शिवम् सुंदरम्’ या गीतावर स्वागतनृत्य सादर केले. एकलनृत्य स्पर्धेत ‘मेरा पिया घर आया’ या गीतावर हर्षा रक्षिये यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांचे दाद मिळवीत प्रथम क्रमांक पटकाविला. गोबरवाही येथील वैशाली गायधने यांनी ‘मोरनी बागा ना बोले’ या गीतावर द्वितीय तर साकोली येथील रजनी धांडे यांनी ‘काहे छेडछाड मोहे’ या गीतावर तृतीय क्रमांक पटकाविला. विनया वरवटे व पल्लवी मेश्राम यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. सरिता निंबार्ते यांनी ‘अप्सरा आली...’ या लावणीवर दाद मिळविली. युगल नृत्य स्पर्धेत पवनी येथील सुप्रिया रेहपाडे व निलीमा लेपसे यांनी ‘जनम जनम’ या गीतावर नृत्य सादर करून परीक्षकांची प्रथम पसंती मिळविली. ‘माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी’ या गीतावर शालू हटवार व सुनीता धांडे या जोडीने द्वितीय क्रमांक पटकाविला. मोहाडी येथील यशोदा निखारे व आरती पराते यांनी उत्तम प्रयत्न केला. समूह नृत्य स्पर्धेत तुमसर येथील ड्रिम ग्रुपने आसाम येथील ‘बिहु’ लोकनृत्य प्रकार सादर करून प्रथम क्रमांकाचा मान पटकाविला. भंडारा येथील राधा कृष्ण ग्रुपने ‘शांताबाई शांताबाई’ या धमाल गीतावर दर्शकांची वाहवा मिळवित द्वितीय क्रमांक पटकाविला. लाखनीतील एकवीरा ग्रुपला गोंधळ नृत्याकरिता तृतीय क्रमांक देण्यात आला. प्रोत्साहनपर बक्षीस भंडाऱ्यातील स्फूर्ती ग्रुप व गोबरवाहीतील साई ग्रुपने मिळविला. एकपात्री अभिनय स्पर्धेत ऐतिहासिक चरित्र ‘हिरकणी’चे सादरीकरण करून पवनी येथील नीलिमा लेपसे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तुमसर येथील वनिता बारस्कर यांनी ‘कामवाली जनाबाई’ साकारून द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक तारामती रामटेके यांनी मिळविला.सलाद डेकोरेशन स्पर्धेत अंजली गडरिये प्रथम, अल्का खराबे द्वितीय तर मीना खोत तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. बुके मेकिंग स्पर्धेत जयश्री बोरकर प्रथम, तुलसी धकाते द्वितीय तर चेतना नेवारेला तृतीय क्रमांक मिळाला. सखी जल्लोष स्पर्धेचे विशेष आकर्षण पवनीच्या जया नागुलकर, लाखनीच्या ज्योती पिंपळे व भंडाऱ्यातील चंद्रमाला गांधी यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी ग्रीन माईन्ड्स या सामाजिक संस्थेने ‘सुंदर भंडारा - स्वच्छ भंडारा’ या विषयावर पथनाट्य सादर केले. संध्या किरोलीकर यांनी या उपक्रमाविषयी महिलांना प्रोत्साहित केले. साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी व भंडारा तालुक्यातील १७० स्पर्धकांनी विविध स्पर्धकांनी कलेचे सादरीकरण केले. विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण विक्रम फडके, कोमल सेलोकर, प्रणित उके, टिना दुधकार व पूनम हटवार यांनी केले. विजयी स्पर्धकांना बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक सखी मंचच्या जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी केले. महोत्सवाचे संचालन बालविकास मंचचे जिल्हा संयोजक ललित घाटबांधे यांनी तर स्पर्धेचे संचालन सुप्रिया सिंग व ज्योत्स्ना सूर्यवंशी यांनी केले. आभारप्रदर्शन कार्यालय प्रमुख मोहन धवड यांनी केले. कार्यक्रमात तालुका सखी प्रतिनिधी शिवानी काटकर लाखनी, रितु पशिने तुमसर, अल्का भागवत पवनी, सुचिता आगाशे साकोली, दुर्गा धकाते गोबरवाही हे उपस्थित होते. महोत्सवासाठी रामचंद्र प्लायवूड, ओम साई रेस्टॉरन्ट लाखनी, दि भंडारा नागरी महिला सह. पत संस्था, इंद्रायणी टेक्निकल इंन्स्टीट्यूट, सुख-शांती क्लिनिक, इन्फोसिस कॉम्प्युटर व कमला डिजिटल स्टुडिओ यांचे सहकार्य लाभले. या महोत्सवासाठी स्नेहा वरकडे, कल्पना डांगरे, अर्चना गुर्वे, सुहासिनी अल्लडवार, राखी सूर, अंजली वंजारी, शिल्पा न्यायखोर, मनीषा रक्षिये, मनीषा इंगळे, संगीता भुजाडे, कांता बांते, मंगला डहाके, मंगला क्षीरसागर, सोनाली तिडके, सारिका मोरे, ज्योती मलोडे, अंजू पिपरेवार, सुधा बगा, संगीता सुखानी, दीपा काकडे, वंदना दंडारे यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)