जिल्ह्यात २१ जुलै राेजी बकरी ईद साजरी हाेत आहे. जनावरांची कत्तल, कुर्बानी वाहतूक आदी बाबी लक्षात घेता, ४ मार्च २०१५ पासून महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याची काटेकाेरपणे अंमलबजावणी करावी, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
काेराेनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे ईदची नमाज मशीद, ईदगाह किंवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्याच घरी अदा करावी, असे यावेळी सांगण्यात आले. ईदनिमित्त काेणतीही शिथिलता देता येणार नाही. नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. वाय. एस. वंजारी, पाेलीस निरीक्षक सुनील तेलुरे, लाेकेश काणसे आदी उपस्थित हाेते.