शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

रोहयोतून मजुरांना झाली साडेसहा कोटी रुपयांची कमाई

By admin | Updated: May 7, 2016 01:01 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कुशल-अकुशल कामांअतर्गत भंडारा जिल्ह्यातील मजुरांनी सुमारे साडेसहा कोटी रुपयाची कमाई केली आहे.

कुशल-अकुशल कामे : लाखांदूर तालुक्यात साडेसात हजार मजूर लाखांदूर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कुशल-अकुशल कामांअतर्गत भंडारा जिल्ह्यातील मजुरांनी सुमारे साडेसहा कोटी रुपयाची कमाई केली आहे. लाखांदूर तालुक्यातील ७,५०० मजुरांना महिनाभरात ९० लाख रूपयाची कमाई झाली आहे. रोजगार हमी योजनेतंर्गत कुशल-अकुशल कामांचा समावेश असलेल्या या योजनेत जिल्ह्यातील सातही तालुक्यात सिमेंट रस्ता बांधकाम, घरकुल बांधकाम, पांदण रस्त्यावर मातीकाम, मुरूमकाम, मोरी बांधकाम, तलाव खोलीकरण, नाला सरळीकरण, भातखाचर, सिंचन विहिर आदींचा समावेश आहे. शासन धोरणानुसार मजुरांना या योजनेअंतर्गत १०० दिवस काम देण्याची तरतूद असतांना बहुतांश ग्रामपंचायतीत या तरतुदीचे पालन करण्यात आले नसल्याचे वास्तव आहे. ग्रामपंचायत स्तरावरील नियोजनशुन्यतेमुळे ग्रामीण भागातील मजुरांना शासन नियमानुसार १०० दिवस काम मिळाले नसल्याची खंत अनेकांनी बोलून दाखविली. दरम्यान अकुशल व कुशल कामांतर्गत जिल्ह्यातील भंडारा, लाखांदूर, लाखनी, मोहाडी, पवनी, साकोली व तुमसर या सातही तालुक्यात साडेसहा कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. सदर कामे यंदाच्या वर्षी केवळ महिनाभरात करण्यात आल्याने ग्रामीण भागातील जनतेत उत्साहाचे वातावरण आहे. शासन नियमानुसार काही वर्षापासून या योजनेअंतर्गत कमाल मजूरांना १०० दिवस काम दिले जात नसल्याने या योजनेच्या अंमलबजावणी विषयी संशयास्पद चर्चा देखील आहे. ग्रामपंचायतस्तरावर राबविण्यात येणाऱ्या या शासन योजनेत बहुतांश रोजगार सेवक काही हितसंबंधीत मजूरांना कामे देऊन १०० दिवस मजुरीचा आकडा फुगवत असले तरी कमाल मजूर या उद्दिष्टापासून अद्यापही वंचित असल्याचे वास्तव आहे. प्रथम मजूर नसताना देखील काही गावातील रोजगार सेवक स्वमर्जीनेच मग्रारोहयोच्या कामावर हेतूपुरस्पर हितसंबंध प्रस्थापित करुन मजुरांची नेमणुक करीत असल्याची ओरड आहे. शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावरुन यंत्रणा कार्यान्वित केली असतांना रोजगार सेवकांचे हितसंबंध काही गावातील कामांमध्ये आड येत असल्याचा आरोप अनेकांनी केला. मात्र जिल्हा प्रशासनाच्या कर्तव्य तत्परतेने यंदाच्या वर्षी मजुरांनी साडेसहा कोटी रूपयांची कारवाई करुन या योजनेच्या अंमलबजावणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. (तालुका प्रतिनिधी)