शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

दोन सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे

By admin | Updated: December 18, 2015 01:00 IST

कर्जदारांना नमुना ८ च्या खोट्या पावत्या देवून त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पवनी पोलीस ठाण्यात दोन तर अड्याळ पोलीस ठाण्यात चार सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१२ गुन्ह्यांची नोंद : कारवाईकडे सर्वांचे लक्षपवनी : कर्जदारांना नमुना ८ च्या खोट्या पावत्या देवून त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पवनी पोलीस ठाण्यात दोन तर अड्याळ पोलीस ठाण्यात चार सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यात आतापर्यंत १२ सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या सावकारांनी कर्जदारांना महाराष्ट्र गावकरी अधिनियम मधील नमुना ८ च्या खोट्या पावत्या देवून त्यांची फसवणूक केली. या खोट्या पावत्या या सावकारांनी खऱ्या म्हणून वापरल्या. तसेच या सावकारांनी या संबंधी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम २४ अनुसार संबंधित रजीस्टरला याची नोंद न घेतल्याने शासनाचा महसूल बुडविला. या संबंधाने अनेक कर्जदारांनी तालुका सहायक निबंधक कार्यालयाकडे तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारीची गंभीर दखल घेवून चौकशी करण्यात आली.या चौकशीत अनेक गंभीर अनियमीतता आढळून आल्याने पोलीस स्टेशनमध्ये या सावकारांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आल्या. या तक्रारीच्या आधारे भादंवि ४२०, ४६८, ४७१ सहकलम २४, ४३ महा. सावकारी अधिनियम अंतर्गत पवनी पोलीस स्टेशनमध्ये पवनी येथील सावकार कृष्णअवतार रामकरण कलंगी विरूद्ध अप क्रं. १३८/१५ अन्वये व प्रकाश केवळराम चित्रीव विरूद्ध १३९/१५ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पवनी पोलीस ठाण्यात ८ सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अशाच प्रकारे अड्याळ पोलीस ठाण्यात उषा लांबट रा. कोंढा (कोसरा), गोपाल लांबट रा. अड्याळ सदाशिव मस्के रा. कोंढा व महादेव धाबेकर रा. पालोरा चौ. या चार सावकाराविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत एकूण १२ सावकाराविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील चौकशी पवनी व अड्याळ पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)