शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धान चुकाऱ्यासाठी आश्वासनाचे गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 05:00 IST

उन्हाळी धानाचे चुकारे गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना मिळाले नाही. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाचे गर्तेत जात आहे, आर्थिक अडचणीचा सामना करीत असताना राज्य सरकार गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. या शिवाय बोनसची अर्धी राशी मिळालेली नाही. शासन ठोस उपाययोजना करीत नाही. फक्त कागदी घोडे नाचवत वेळ मारून नेली जात आहे. शेतकऱ्यांना आश्वासनाचे गाजर दाखवीत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात निधीअभावी बोजवारा सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी धानाचे चुकारे अडल्याच्या कारणावरून भाजपच्या वतीने सिहोरा येथे भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चर्चेत तोडगा निघाला नसल्याने आंदोलनकर्त्यांनी पुन्हा १५ दिवसांचा अल्टिमेटम शासनाला देण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांची अटक व सुटका करण्यात आली आहे. आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार चरण वाघमारे, तारिक कुरेशी यांनी केले. उन्हाळी धानाचे चुकारे गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना मिळाले नाही. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाचे गर्तेत जात आहे, आर्थिक अडचणीचा सामना करीत असताना राज्य सरकार गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. या शिवाय बोनसची अर्धी राशी मिळालेली नाही. शासन ठोस उपाययोजना करीत नाही. फक्त कागदी घोडे नाचवत वेळ मारून नेली जात आहे. शेतकऱ्यांना आश्वासनाचे गाजर दाखवीत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात निधीअभावी बोजवारा सुरू आहे. नदीपात्रातून गाळ उपसा करण्यात येत नसल्याने पाण्याचा उपसा करताना अडचणी येत आहेत. राज्य सरकारने नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही.खरीप हंगामात सुरू असताना खत पुरवठा करण्यात येत नाही. कृषी विभागाची यंत्रणा असताना चौकशी व कारवाई करीत नाही. या व अन्य विषयाला घेऊन सिहोरा गावात राष्ट्रीय महामार्गावर भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार चरण वाघमारे, तारिक कुरेशी, तालुकाध्यक्ष राजेश पटले, सुभाष बोरकर यांनी केले. रास्ता रोको आंदोलनात राज्यातील महाआघाडी शासनाचा खरपूस समाचार घेण्यात आला. आंदोलनकर्त्यांचे विषयावर चर्चा करण्यात आली, चर्चेत तहसीलदार तेले, कार्यकारी अभियंता कुरझेकर, उपविभागीय अभियंता सिंग, स्नेहल सोनटक्के, पोलीस निरीक्षक पाटील, न्यायमूर्ती, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहारे उपस्थित होते. शेतकरी व जनसामान्यांना न्याय देणाऱ्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. परंतु चर्चेत तोडगा निघाला नाही. आंदोलनकर्त्यांना भरीव आश्वासन मिळाले नाही. यानंतर भाजपचे नेते व कार्यकर्ते थेट राष्ट्रीय महामार्गावर आले. माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार चरण वाघमारे, तारिक कुरेशी, राजेश पटले, सुभाष बोरकर, किशोर राहगडाले, सतीश चौधरी, बंटी बानेवार, देवानंद लांजे, बंडू बनकर, डॉ. अशोक पटले, विकास बिसने, नंदू राहंगडाले, अंबादास काणतोडे, पिंटू हूड, मयूरध्वज गौतम, गजानन निनावे, मोतीलाल ठवकर, योगराज तेंभरे, सचिन खांगार, गोपाल येडे, नंदू तुरकर, विनोद पटले, डॉ. मुरलीधर बानेवार, मुन्ना फुंडे, भास्कर सोनवणे, अमित जयस्वाल, सुनील पटले यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत होणार नाही, याकरिता आंदोलनकर्त्यांना अटक व सुटका करण्यात आली आहे. 

१५ दिवसांचा अल्टिमेटम - आंदोलनकर्त्यांनी शासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड