शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

तोडणीही परवडेना; हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी

By युवराज गोमास | Updated: May 2, 2024 20:18 IST

बाजारात मिरचीचे भाव कोसळले : शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघेना

भंडारा: शेतकरी सध्या अवकाळी वादळी पाऊसाने तसेच शेतमालाचे भाव कोसळल्याने चांगलाच संकटात सापडला आहे. बाजारात हिरव्या मिरचीला किरकोळ विक्रीत ३० रूपयांचा भाव मिळतो आहे. परिणामी हिरव्या मिरच्यांनी तोड्याअभावी झाडावरच नांगी टाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हीच स्थिती लाल मिरचीच्या बाबतीतही दिसून येत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर २५० ते ३०० रूपयांपर्यंत कडाडणारी लाल मिरची यंदा १५० रूपयांपर्यंत खाली उतरली आहे.अवकाळी संकटाशी दोन हात करून बळीराजा शेती फुलवीत आहे. परंतु, घामाच्या थेंबांनी शेती हिरवीगार करणारा बळीराजा यंदा मात्र बाजारभाव गडगडल्याने पुरता खचला आहे. पडलेल्या बाजारभावाने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मागील वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाला. प्रति क्विंटल तीस हजार रुपयांपर्यंत भाव होता. उत्पादन अल्प झालं होतं. मात्र वाढलेल्या बाजारभावाने शेतकरी फायद्यात राहिले. मिरचीला मिळालेला योग्य भाव बघता यावर्षी जिल्ह्यात मिरचीचा पेरा वाढला. तुलनेत उत्पादन मोठे झाले. मात्र, बाजारभाव कोसळला. हिरव्या मिरचीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मिरची तोडणीचा खर्चही यातून भागताना दिसत नाही. घर खर्च चालविण्याची ऐपतही मिरची उत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली नाही.

स्थानिक मजुरांच्या रोजगाराला फटका

सध्या शेतशिवारात मिरची तोडणी शेवटच्या टप्पा सुरू आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे पहाटे ७ ते १२ वाजेपर्यंत मजूर मिरची तोडतात. यातून त्यांना दोनशे ते तीनशे रुपये मजुरी मिळत असते. मिरचीमुळे स्थानिक मजुरांच्या हातांना रोजगार मिळतो. परंतु, भाव गडगडल्याने स्थानिक मजुरांच्या रोजगारावर परिणाम जाणवत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक खर्च परवडणारा नसल्साने तोडणी बंद केली आहे.

खर्च लाखाचा, उत्पन्न मात्र अत्यल्प

मिरची लागवडीसाठी एका एकराला साधारणता एक लाखाच्यावर खर्च अपेक्षित असते. परंतु, सध्या पडलेल्या भावामुळे मिरची लागवडीसाठी लावलेला खर्चही निघेना अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मिरची पिकाने दिलेला आर्थिक दगाफटका बघता पुढील वर्षी पेरा कमी होण्याची शक्यता शेतकरी श्रीकृष्ण वनवे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराFarmerशेतकरी