शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रावरील जाचक अटी रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : खरीप हंगामातील धान विक्रीसाठी बाजारपेठेत येण्यास सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू ...

ठळक मुद्देप्रेमसागर गणवीर : शासनाला पाठविले पत्र, खरेदी केंद्रावरील अडचणी दूर करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामातील धान विक्रीसाठी बाजारपेठेत येण्यास सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जात आहे. मात्र खरेदी केंद्रावर पाखड धान खरेदी केला जात नसून अनेक जाचक अटी शासनाने लागू केल्या आहे. त्यामुळे आधीच परतीच्या पावसाने खचलेल्या शेतकऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाने या जाचक अटी त्वरीत रद्द करुन शेतकºयांना कुठलाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला आहे.जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे तोंडचा घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी खचला असून त्याला आधाराची गरज आहे.मात्र जेव्हा शेतकरी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नेत आहेत. तेव्हा केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना खरेदीसाठी विविध अटी लागू केल्या जात आहे.परतीच्या पावसामुळे पाखड झालेला धान सुध्दा खरेदी नकार दिला जात आहे. तर आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे. काही ठिकाणी अद्यापही केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाकडे पुरेशी यंत्रणा सुध्दा नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये, पाखड धानाची खरेदी करण्यात यावी आणि धान खरेदीसाठी लावलेल्या जाचक अट्टी त्वरीत रद्द करण्यात याव्या. शेतकºयांना धानाचे चुकारे त्वरीत करण्यात यावे. यासंबंधीचे पत्र देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शासनाला दिले आहे.जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे. कर्ज वसुलीस स्थगिती देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड