शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

चांदपूर जलाशयांतर्गत कालवा विकास थंडबस्त्यात

By admin | Updated: September 27, 2016 00:34 IST

चांदपूर जलाशयाअंतर्गत पाणी वाटप करणारी नहर आणि कालव्याचे निधी अभावी दुरवस्था झाली आहे.

४० कोटींची आवश्यकता : पाणी वाटपात कर्मचाऱ्यांची कसरतरंजीत चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)चांदपूर जलाशयाअंतर्गत पाणी वाटप करणारी नहर आणि कालव्याचे निधी अभावी दुरवस्था झाली आहे. टेल शिवारात पाणी वाटप करताना कर्मचाऱ्यांची कसरत होत आहे. नहर विकासाचे नियोजन थंडबस्त्यात असल्याने पॅकेज मंजूर करण्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. तुमसर तालुक्यात मध्यम प्रकल्प असलेल्या चांदपूर जलाशयाची व्याप्ती मोडी आहे. विस्ताराने वाढीव क्षेत्र असल्याने सिहोरा येथे स्वतंत्र लघु पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. यात जलाशयांतर्गत डावा आणि उजवा असे दोन प्रमुख कालवे परिसरात आहेत. यातून १४ हजार हेक्टर आर शेतीला पाणी वाटप केले जाते. या कालव्याअंतर्गत शेत शिवारात नहर आणि पाटचाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. परंतू कालवे आणि नहराची निधी अभावी दूरवस्था झाली आहे. कालव्यात मोठ्या प्रमाणात झुडपी वाढली आहे. परिणामी पाणी वाटपासाठी कर्मचाऱ्यांची कसरत होत आहे. दरवर्षी नहरामध्ये माती आणि गाळ जमा होत असल्याने टेलवर पाणी पोहचत नाही. यामुळे शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. मुख्य कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण उखडले असून कुठेकुठे भेगा पडलेल्या आहेत. यामुळे कालव्याची रुंदी धोकादायक ठरु पाहत आहे. कालव्याच्या पाळीवरुन रहदारी करणे धोकादायक ठरत आहे. संपूर्ण कालवे आणि नहराचे सिमेंट अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र याच कामाचे नियोजन थंडबसत्यात आहे. कालवा आणि नहराच्या विकासासाठी जवळपास ४० कोटी रुपयांची गरज आहे. स्वतंत्र पॅकेज अंतर्गत निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही. कालव्यांची स्वच्छता ही करण्यात आलेली नाही. बपेरा परिसरातील शेती नव्याने चांदपूर जलाशयाला जोडण्यात आली आहे. जुन्या झालेल्या जिर्ण नहराचे जलाशयाचे पाणी वाटप करण्यात येत आहे. सिलेगाव पंचायत समिती क्षेत्राअंतर्गत जोडण्यात आलेला शेतशिवार टेलवर आहे. या शेतशिवारात जलदगतीने पाणी थेट शेतात पोहचत नाही. अल्प कर्मचाऱ्याच्या खांद्यावर पाणी वाटपाचा डोलारा आहे. लघु पाटबंधारे विभागात ७० टक्के पद रिक्त आहे. महत्वपूर्ण असलेल्या शाखा अभियंत्याची पदे रिक्त आहेत. मजूर कार्यरत आहेत. परिणामी याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना नाहक बसत आहे.सिलेगाव पंचायत समिती क्षेत्र अंतर्गत शेतशिवार टेलवर आहे. नहराचे अस्तरीकरण रखडल्याने पाणी मिळत नाही. समस्या निकाली काढण्यासाठी पॅकेजची गरज आहे.- हिरालाल नागपूरे, गटनेता, पंचायत समिती सदस्यपरिसरात नहराचे आधुनिक पध्दतीने कामे केली जात आहे. पाणी वाटप पूर्ण करण्याचा हेतूने नहरांची स्वच्छता करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी यंत्रणा प्रयत्न करीत आहेत.- एस. एन. वाईनदेशकर, शाखा अभियंता, सिहोरा