शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नहर बांधकामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:32 IST

पाटबंधारे विभागाच्या मार्फत रनेरा ते कर्कापूर दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या नहराच्या कामात अनियमितता होत असल्याचे शंका वर्तविण्यात आलेली होती.

ठळक मुद्देप्रकरण रनेरा येथील : गौण खनिज खननाची होणार चौकशी

आॅनलाईन लोकमततुमसर : पाटबंधारे विभागाच्या मार्फत रनेरा ते कर्कापूर दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या नहराच्या कामात अनियमितता होत असल्याचे शंका वर्तविण्यात आलेली होती. त्याचेच भाग म्हणून ८ फेब्रुवारीला तहसीलदार बालपांडे यांनी कामाच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.चांदपूर जलाशयाला जोडल्या असलेल्या रनेरा ते कर्कापूर दरम्यानच्या २ किमी अंतराचे नहर तयार करण्याचे कामे युध्दस्तरावर सुरु आहे. त्या कामाचे अंदाजित रक्कम ४१ लक्ष रुपये आहे. सदर कामाची सुरुवात गत वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलेली होती. दरम्यान नहराच्या कामात मुरुम पसरविण्याचे काम हे २०१७ च्या मार्च महिन्यात पुर्ण करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदाराकडुन मिळाली आहे. नगर बांधकामाकरिता रनेरा येथील तलाव परिसरातुन २०० ब्रास मुरुम उत्खनन करण्याची परवानगी २०१७ मध्ये देण्यात आली होती.त्या कामाकरिता मुरुमाचे उत्खनन कंत्राटदाराने परवानगीच्या ठिकाणाहून न करता हरदोली येथील स्थानिक शेतकºयाच्या शेतातून केले असल्याची शाब्दीक तक्रार येथील सरंपचानी केली आहे.सध्या त्या नहराच्या सिमेंटीकरणाचे काम सुरु आहे. तयार करण्यात येत असलेले नहर हरदोली येथील मुख्य वितरिकेतून बायपास करुन तयार करण्यात येत आहे. हरदोलीचे सरपंच नितीन गणवीर यांच्या माहितीप्रमाणे त्या नहर कामात वापरण्यात आलेले मुरुम हे गावातील शेतकºयांच्या शेतजमीनीतून खनन केले असल्याची तोंडी तक्रार केली आहे. मुरुम पसरविण्याचे काम होऊन एक वर्षाचा कालावधी झालेला असून वापरण्यात आलेले गौण खनीज नेमक्या कोणत्या ठिकाणाहून खनन करण्यात आले, यावर चौकशी केली जाणार असल्याचे तहसीलदार बालपांडे यांनी सांगितले. पाहणी दरम्यान कंत्राटदाराने मुरुम उत्खननाचे राजस्व भरल्याबाबतचे चालान प्रस्तुत केले असल्याचे सांगण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीप्रमाणे तहसीलदार गजेंद्र बालपांडे तथा तलाठी, मंडळ अधिकाºयांची चमु व पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता हटवार यांनी गुरुवारला कामाच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. दरम्यान मुरुमाच्या केलेल्या कामाला एक वर्षाचा कालावधी लोटला असुन त्या कालावधीदरम्यान रनेरा येथील तलावाचे लिज अनेकदा देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.नहर बांधकामात वापरण्यात आलेल्या मुरुमाचे राजस्व कंत्राटदाराने भरल्याचे चालन प्राप्त झाले आहे. मुरुम उत्खनन नेमक्या कोणत्या ठिकाणाहून केले आहे. यावर चौकशी अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येईल.- गजेंद्र बालपांडेतहसीलदार तुमसर