शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यातील झुडुपात बिबट्यासह बछड्यांचा ठिय्या; वनविभाग सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 14:21 IST

खैरी / पट गावालगतच्या झुडुपात दडून असलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांनी परिसरातच एका माकडाची शिकार करून झुडुपात ठिय्या मांडला. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ परिसरात बिबट व बछड्यांना पाहण्याकरिता एकच गर्दी केली.

ठळक मुद्देखैरी / पट गावातील घटना

लाखांदूर (भंडारा) : शिकारीच्या शोधात जंगलातून भटकलेल्या एका बिबट्यासह दोन बछड्यांनी गावालगतच्या शेतशिवारात प्रवेश करून माकडाची शिकार करीत नाल्यातील झुडुपात ठिय्या मांडल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर घटना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तालुक्यातील खैरी/पट गावालगतच्या नाल्याजवळ उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास स्थानिक खैरी/पट येथील एक व्यक्ती गावालगतच्या नाल्याजवळ शौचास गेला होता. यावेळी संबंधित व्यक्तीला नाल्या लगतच्या झुडुपात एक बिबट व दोन बछडे दिसून आले. त्याने याबाबत  स्थानिक नागरिकांसह लाखांदूर वनविभागाला माहिती दिली.

परिसरात बिबट्यासह दोन बछडे असल्याची माहिती नागरिकांना होताच नागरिकांनी घटनास्थळ परिसरात बिबट व बछड्यांना पाहण्याकरिता एकच गर्दी केली होती. तर, काहीजण नाला परिसरातीलच काही घरांच्या छतावरून बिबट व त्याचे दोन बछडे पाहताना दिसून आले. दरम्यान, स्थानिक वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून गस्त सुरू केली आहे. बिबट्या व बछड्यांच्या सुरक्षिततेसह अन्या दुर्घटना टाळण्याहेतू वन व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर असलेली नागरिकांची गर्दी कमी केली.

दरम्यान, शिकारीच्या शोधात गत ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास स्थानिक खैरी/पट शेतशिवारात प्रवेश केलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांनी शुभम भागडकर नामक शेतकऱ्याच्या झोपडीत प्रवेश करून ३४ कोंबड्यांसह एका श्वानाची शिकार केली होती. या घटनेला केवळ १० दिवस लोटत नाही तोच दुसऱ्यांदा बिबट्यासह दोन बछडे खैरी/पट गावाजवळील नाल्यालगतच्या झुडुपात असल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांत बिबट्याची दहशत दिसून येत आहे.

बाभळीच्या झाडावरून वनमजुराची गस्त

नाल्यालगतच्या झुडुपात बिबट्यासह दोन बछड्यांनी ठिय्या मांडल्याने त्यांच्याकडून होणारी अन्य दुर्घटना टाळण्याहेतु वन व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून गस्त केली जात आहे. यावेळी विकास भुते नामक वनमजूर नाला परिसरातीलच बाभळीच्या झाडावर चढून गस्त करताना दिसून आला.

टॅग्स :leopardबिबट्याenvironmentपर्यावरणforest departmentवनविभाग