शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पेरणीच्या तोंडावर बैलजोडी महागली; गुरांचा बाजार देखील १० टक्क्यांनी वधारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:54 IST

Bhandara : क्षमता व देखण्या बांध्यानुसार किमत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतीउपयोगी तसेच दुधाळ जनावरांच्या गुरांच्या खरेदी-विक्रीची लगबग वाढली आहे. भंडारा शहरातील रविवारचा गुरांचा बाजार चांगलाच कडाडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बाजारात जनावरांच्या किमती जवळपास १० टक्क्यांनी वधारल्या आहेत.

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. अलीकडे ट्रॅक्टरचा वापर वाढला असला तरी बैलजोड्यांच्या मदतीने शेती अनेकजण करतात. रविवारला भंडारा शहरातील गुरांच्या बाजारात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. शेती उपयोगी ५० हजारांत मिळणारी बैलजोडी वय व योग्यतेनुसार ५५ हजार ते ६० हजारांच्या किमतीत विकली गेली. दुधाळ संकरीत गायीसुद्धा ४० ते ५० हजारांपर्यंत विकल्या गेल्या. म्हशींच्या बाजारात मात्र फारशी तेजी दिसून आली नाही.

क्षमता व देखण्या बांध्यानुसार किमतशेतकरी बैलजोडी निवडताना बैलांची ताकद, वय, वजन आणि शारीरिक बांधणी व आरोग्याचा बारकाईने विचार करतात. नांगरणी, पेरणी, तणस व गवत वाहतूक तसेच अन्य शेतीकामासाठी बैलजोडीचा उपयोग होतो. तरुण व शारीरिक मजबुती असलेल्या बैलजोड्यांना मागणी दिसून आली. त्यासाठी अधिक किमत मोजावी लागली.

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेजिल्ह्यात अनेक शेतकरी शेतीचा हंगाम आटोपताच पालनपोषण करण्याचा त्रास वाचविण्यासाठी बैलजोडी विकतात तर हंगामाच्या प्रारंभी खरेदी करतात. यंदा हंगाम १५ ते २० दिवसांपूर्वीच सुरू झाल्याने बैलबाजारात खरेदी-विक्रीची धावपळ दिसून आली परंतु, बैलजोडी खरेदी करताना अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडल्याची चर्चा बाजारात दिसून आली.

"खुल्या शेतात ट्रॅक्टर चालवणे सोयीचे असते. पण पावसाळ्यातील अधिक ओलाव्यामुळे भाजीपाला पिकात ट्रॅक्टर जाऊ शकत नाही. त्याच ट्रॅक्टरचे दर वाढल्याने अनेकांना बैलजोडीशिवाय पर्याय नसतो, परंतु आता बैलजोडीचा भाव वधारल्याने पेरणीचा खर्च वाढणार आहे. "- घनशाम आगासे, शेतकरी, निलज.

टॅग्स :bhandara-acभंडारा