शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अतिक्रमणावर चालणार ‘बुलडोजर’

By admin | Updated: January 17, 2015 01:11 IST

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौक परिसरातील मुख्य बाजार परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे शहराचा विकास खुंटला आहे.

भंडारा : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौक परिसरातील मुख्य बाजार परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे शहराचा विकास खुंटला आहे. या अतिक्रमणावर शनिवारी बुलडोजर चालणार असून ही कारवाई पालिका प्रशासन पोलिस विभागाचा मदतीने करणार आहे. भंडारा शहराची नगरपालिका गांधी चौकात असून हेच शहरातील व्यापाऱ्यांचे मुख्य केंद्र आहे. गांधी चौक ते बसस्थानकापर्यंत व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन रस्त्यावर दुकानातील साहित्य खरेदीदारांना आकर्षीत करित आहेत. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे स्थायी तथा अस्थायी दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी त्यांचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी केली होती. अतिक्रमणामुळे शहर सौंदर्यीकरणही वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. शनिवारपासून गांधी चौकापासून हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे. दरवेळेस अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण ‘जैसे थे’ होते. त्यामुळे ही कारवाई फारस तर ठरणार नाही याबाबतही नागरिकांमध्ये शंका निर्माण होत आहे. (शहर प्रतिनिधी)सतर्कतेचा इशाराबाजारातील रस्त्यांवर दुकानातील साहित्य ठेवून अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांचे अतिक्रमण स्वत: काढावे अन्यथा कारवाईला सामोरे जाताना त्यांचे नुकसान होईल असा इशारा लाऊडस्पिकरद्वारे पालिकेने दिला आहे. यामुळे दुकानदारांनी अतिक्रमण काढण्यास मदत करावी असे आवाहनही पालिकेने केले आहे. पालिका, मिस्किन टँक परिसरात पार्र्किं गस्थळनगरपालिका इमारतीपुढे दुकानदारांनी अतिक्रमण केल्यामुळे नगर पालिकेत येणाऱ्यांसाठी वाहनतळ नाही. त्यामुळे पालिकेसमोर ५० फुटाची जागा वाहनतळासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. मिस्किन टँक प्रवेशद्वारापर्यंत दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने तलावाचे सौंदर्य लपले आहे. नागरिकांना या बगिचाची माहिती व्हावी व नागरिकांचा ओढा वाढावा यासाठी त्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. हे दुकाने हटवून तिथेही वाहनतळासाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. बसस्थानक परिसरातील रिकाम्या जागेत आॅटोकरिता पार्किंग झोन बनविण्यात येणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाला पत्र पाठविणार आहे.