शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी निधीतून गावात गोदामाची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

धानाचे विक्रमी उत्पादन व खरेदी केंद्रावर धानाची वाढती आवक असताना गोडावून अपुरे ठरत आहेत. यामुळे धानाचे पोती उघड्यावर असुरक्षित पणे ठेवण्यात येत आहे. या पोत्यांना अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. यात केंद्र संचालकांचे नुकसान होत नाही. नुकसान मात्र शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. परंतु शासन व लोकप्रतिनिधी गंभीर होताना दिसत नाही.

ठळक मुद्दे२० लाखांच्या निधीची गरज : सरपंचांचे शासनाला निवेदन, नैसर्गिक आपत्तीपासूनही होऊ शकणार बचाव

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : नद्यांच्या खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरात खरीप आणि रब्बी हंगामात धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात येत आहे. परंतु गोदाम नव्याने बांधण्यात येत नाही. नवीन गोदामांची निर्मिती करण्याची मागणी सरपंचांनी एका निवेदनातून केली आहे.वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरात धानाचे प्रमुख पीक घेतले जाते. शेतकऱ्यांची लूट थांबविण्याकरिता शासन या परिसरात खरीप आणि रब्बी हंगामात धान खरेदी केंद्रांना मंजूरी देत आहे. ज्या गावात खासगी गोडावून आहेत अशा गावात धान खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहे.धानाचे विक्रमी उत्पादन व खरेदी केंद्रावर धानाची वाढती आवक असताना गोडावून अपुरे ठरत आहेत. यामुळे धानाचे पोती उघड्यावर असुरक्षित पणे ठेवण्यात येत आहे. या पोत्यांना अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. यात केंद्र संचालकांचे नुकसान होत नाही.नुकसान मात्र शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. परंतु शासन व लोकप्रतिनिधी गंभीर होताना दिसत नाही. प्रत्येक गावात ग्रामपंचायत असताना शासनस्तरावर शेतकऱ्यांचे उज्ज्वल भवितव्य करिता निधी देण्यात येत नाही. गावात गोडावून नसल्याने धान खरेदी करताना अडचणी येत आहेत. गावात विकासाचा अनुशेष बोटावर मोजण्याइतपत शिल्लक आहे.खासदार आणि आमदार या लोकप्रतिनिधीचा स्थानिक विकास निधी सभामंडप कामाचे खर्चावर येत गावात होत आहे. या निधी गावात गोडावून निर्मितीकरिता वळते करण्याचे ओरड सुरु झाली आहे. गोडावून निर्मितीकरिता २० लाख रुपयाची गरज आहे. या गोडावून मध्ये १० हजार पोती सुरक्षित ठेवण्याची सोय होणार आहे. गावात गोडावून निर्मिती झाल्यास धान खरेदी गावातच करण्यात मदतीचे ठरणार आहे. यात शेतकऱ्यांचे वहन खर्च बचतीचे ठरणार आहे.वर्षभर परिसरात धानाची खरेदी होताना गोडावून निर्मितीच्या गंभीर विषयाकडे कुणाचेही लक्ष नाही. या विषयावर विधानसभा व लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे. लोकसभेचा सभागृह गाजविण्यात येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. या गोडावून निर्मितीवर ग्रामपंचायती प्रजासत्ताक दिनी ठराव पारित करणार आहेत. शासनाला प्रस्ताव देण्यात येणार असून गावात गोडावून निर्मितीकरिता निधी उपलब्ध करण्याची मागणी टेमणीच्या सरपंच पमूताई भगत यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsarpanchसरपंच